परभणीत MIM चे नवनियुक्त जिल्हा समन्वयक मो. गौस झैन यांची माहिती!
परभणी (Local Body Elections) : राज्यात गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका (Local Body Elections) घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जारी केले आहे.त्यानुसार प्रभाग रचनेची तयारी सुध्दा सुरू झाली असून जिल्ह्यातील सर्व न. प., जि.प., मनपा, ग्रामपंचायत व इतर निवडणूका एमआयएम पक्ष (MIM Party) परभणी जिल्ह्यात खंबीरपणे एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅ. असदोद्दीन ओवैसी व प्रदेशाध्यक्ष माजी खा. इम्तीयाज जलील यांच्या नेतृत्वाखाली लढविणार असल्याचे एमआयएमचे नवनियुक्त जिल्हा समन्वयक मो. गौस झैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शनिवार 14 जून रोजी हॉटेल झैन तंदुरीवाला येथे पत्रकार परिषद (Press Conference) पार पडली.
प्रदेशाध्यक्ष खा इम्तियाज जलील यांचा आदेश पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मो गौस झैन यांची नियुक्ती!
यात पक्षाचे निरीक्षक मोहम्मद वसीम यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना गौस झैन यांनी सांगितले की, सामाजिक संतुलन अबाधित राहण्यासाठी एमआयएम पक्षाच्या वतीने मुस्लीम, दलित, ओबीसी, कुणबी, मराठा व इतर वंचित समाजाला (Deprived Society) सोबत घेऊन आगामी काळात जिल्ह्यात होणार्या निवडणूका खंबीरपणे लढवणार असल्याचे म्हणाले. नवीन दृष्टीकोन सामाजिक सुधारणा (Social Reform) केल्या शिवाय प्रस्थापितांना सत्तेतून दूर करणे कठीण आहे. यांना दूर केल्या शिवाय विकास होणार आहे, असे ते म्हणाले. आज परभणी येथे विकास कोसो दूर असून सर्व विकासाच्या नावावर सत्ताधारी पक्षात जात आहे. मात्र सत्ताधारी पक्षात गेलेल्या मनपा सदस्यांमुळे एमआयएम पक्षाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. व सर्व समाजातील नवीन चेहरे एमआयएम पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत येणार्या काळात दिसतील.
सत्ताधारी पक्ष सोडून इतर पक्षांनी प्रस्ताव मांडला तर युती!
सत्ताधारी पक्ष सोडून इतर पक्षांनी जर एमआयएम सोबत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती बाबत चर्चा केली तर सदरील प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष यांच्या समोर ठेवणार असल्याचे मो. गौस म्हणाले.