हिंगोली (Local crime branch) : वसमत तालुक्यातील चोंढी फाट्यावर अवैध रित्या तलवार बाळगल्याने एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून गुन्हा दाखल केला. २५ ऑगस्ट रोजी रात्री ११.१५ च्या सुमारास आंबा येथील सचिन प्रताप कांबळे याने आपल्या जवळ विना परवाना लोखंडी तलवार बाळगून लोकामध्ये दहशत निर्माण केल्याने त्याच्या विरूध्द २६ ऑगस्टला कुरूंदा पोलिस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे साईनाथ कंठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन कांबळे याच्या विरूध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक कमलेश मीना, (Local crime branch) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार भुजंग कोकरे, आकाश टापरे, साईनाथ कंठे, ज्ञानेश्वर गोरे यांनी केली.