परभणीच्या गंगाखेड बसस्थानकातील घटना
अज्ञातावर गुन्हा दाखल
अज्ञातावर गुन्हा दाखल
परभणी (Gangakhed Crime) : गंगाखेड येथे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत पॅन्टच्या खिशातून वीस हजारांची रोकड लंपास करण्यात आली. ही घटना ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास (Gangakhed Crime) गंगाखेड येथील बसस्थानकात घडली. या प्रकरणी १२ ऑगस्टच्या रात्री अज्ञातावर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लिंबाली गिते यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे गंगाखेड बसस्थानक येथून परळीला जाण्यासाठी परतवाडा – परळी बसमध्ये चढत होते. यावेळी मोठी गर्दी झाली. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातून वीस हजाराची रोकड लंपास केली.चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर (Gangakhed Crime) गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. तपास पोह. माहोरे करत आहेत.
सोन्याचे दागिने, रोकड चोरली
जिंतूर : गर्दीचा फायदा घेत एका वृध्द महिले जवळील सोन्याचे दागिने, रोख रक्कम मिळून १० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल चोरण्यात आला. ही घटना मंगळवार १२ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास जिंतूर बसस्थानकात घडली. पुष्पाबाई ठोंबरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहेनाज बेगम या महिलेवर जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोह. लांडगे करत आहेत.