जन्मोत्सव विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात संपन्न होणार!
रिसोड (Maharana Pratap Singh ji) : रिसोड तालुक्यातील वाकद या गावी दिनांक 29 मे 2025 रोज गुरुवार ला जगप्रसिद्ध योद्धा महाराणा प्रताप सिंह (Maharana Pratap Singh) जी यांच्या तिथीनुसार जन्मोत्सव असतो. अखंड भारतामध्ये राजपूत समाजासह (Rajput Society) सर्व समाजाचे बंधू भगिनी मोठ्या उत्साहात व आनंदात जन्मोत्सव साजरा करीत असतात. त्यानुसार या वर्षी प्रथमच आपल्या ग्राम वाकद येथे समस्त गावकऱ्यांच्या (Villagers) वतीने व सकल राजपूत संघटना वाशिम जिल्हा व रिसोड तालुका च्या वतीने हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जी यांचा जन्मोत्सव विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात संपन्न होणार आहे.
होमिओपॅथी रोग निदान तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित!
या प्रसंगी डॉ, सागर ठाकूर यांच्या प्रताप हॉस्पिटल वाशीम द्वारा यांच्या वतीने भव्य मोफत अस्थिरोग निदान व उपचार तथा मार्गदर्शन शिबिर दुपारी 11 ते 4 पर्यंत तसेच माजी सैनिक संघटना रिसोड तालुका यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर, उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर, यांच्या वतीने भव्य नेत्र तपासणी शिबिर डॉ, सौ. माही चोहान होमिओपॅथिक तज्ञ नाशिक व डॉ, किर्तशसिंह बनाफर यांच्या वतीने होमिओपॅथी रोग निदान तपासणी व मार्गदर्शन शिबिर (Guidance Camp) आयोजित केलेले आहे. वेळ सर्व शिबिर जिल्हा परिषद शाळा वाकद येथे पार पडणार आहे त्यानिमित्त समस्त राजपूत समाज बांधवांनी वाकद सर्कल मधील सर्व गरजू रुग्णांनी मोफत असणाऱ्या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी वाकद नगर प्रदक्षिणा भव्य(मिरवणूक) दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत. महाराणा प्रताप सिंह चौक बस स्थानक वाकद येथून गाव फेरी करून जिल्हा परिषद शाळा वाकद येथे तालुक्यातील माजी स्वातंत्र सैनिकांचा सत्कार (Salute To Freedom Fighters) समारंभा नंतर समाप्त होणार आहे. तरी या प्रसंगी समस्त सकल राजपूत संघटना रिसोड (Rajput Organization) व समस्त गावकरी मंडळी वाकद यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे