मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर (Pink e-rickshaw Yojana) : महाराष्ट्र सरकारने पिंक ई-रिक्षा योजना सुरू केली आहे. आज रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या योजनेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पात्र महिलांना (Pink e-rickshaw Yojana) ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. राज्यभरातील 17 शहरातील सुमारे 10,000 महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेचा शुभारंभ केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. नवरात्र चालू आहे. मी लाडली बेहन योजना (CM Ladki Bahin Yojana) सुरू केली. 2.5 कोटी माझ्या प्रिय भगिनींना याचा फायदा झाला आहे. आज येथे (Pink e-rickshaw Yojana) गुलाबी रिक्षा योजनाही सुरू झाली आहे. आज आपल्या अनेक बहिणींना गुलाबी रिक्षा देण्यात आल्या आहेत.
#WATCH छत्रपति संभाजीनगर: महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा, "आज बहुत खुशी का दिन है। नवरात्र चल रहे हैं। मैंने लाडली बहन योजना शुरू की। 2.5 करोड़ मेरी लाडली बहनों को इसका फायदा मिला है। आज पिंक रिक्शा योजना भी यहां पर शुरू हुई है। आज हमारी कई बहनों को पिंक रिक्शा दी… pic.twitter.com/gplyodc1Au
— ANI_HindiNews (@AHindinews) October 6, 2024
काय आहे ही पिंक ई-रिक्षा योजना?
यापूर्वी, सरकारने मुख्यमंत्री लाडली बेहन योजना (CM Ladki Bahin Yojana) सुरू केली होती. ज्यामध्ये 20 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना 1500 रुपये मासिक भत्ता देण्याचे वचन दिले होते. (Pink e-rickshaw Yojana) गुलाबी ई-रिक्षा योजना सुरू करणे या वचनबद्धतेवर आधारित आहे. ज्यामध्ये ई-रिक्षा खरेदीसाठी 80,000 रुपयांपर्यंतचे पुरेसे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.