मुंबई (Maharashtra Yojana) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सरकार गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी नवीन योजना सुरु करणार आहे. या (Ladli Bahna Yojana) योजनेअंतर्गत गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्याची योजना आहे.
महाराष्ट्रातील महिलांना होणार ‘हे’ फायदे
माहितीनुसार, महाराष्ट्र सरकार आपल्या (Maharashtra Yojana) नवीन योजनेंतर्गत दरमहा 1250 रुपयांहून अधिक रक्कम देण्याची योजना आखत आहे. राज्यातील सुमारे दीड कोटी महिलांना या उपक्रमाचा फायदा होऊ शकतो. या योजनेचा लाभ पिवळे आणि केशरी शिधापत्रिका (Ration card) असलेल्या कुटुंबातील महिलांना मिळणार आहे. या योजनेसाठी वयोमर्यादा 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावी. ही योजना (Ladli Bahna Yojana) “लाडली बहना योजने”सारखीच आहे. याव्यतिरिक्त, लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न वार्षिक 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. मध्य प्रदेशच्या भाजप सरकारने लागू केलेल्या ‘लाडली बहना योजने’च्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारला ही योजना सुरू करणार आहे. या लाडली योजनेचे उद्दिष्ट समान महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे.
मध्य प्रदेशात ही योजना यशस्वी
मध्य प्रदेशात “लाडली बहना योजना” (Ladli Bahna Yojana) यशस्वी झाली असून, विधानसभा निवडणुकीत भाजपच्या महत्त्वपूर्ण विजयात योगदान दिले आहे. या योजनेची सुरुवात झाल्यापासून विवाहित, घटस्फोटित आणि इतर अनेक बहिणींना फायदा झाला आहे. ‘लाडली बहना योजने’अंतर्गत (Maharashtra Yojana) महिलांच्या खात्यात दरमहा 1250 रुपये जमा केले जातात. गेल्या 11 महिन्यांत मध्य प्रदेशातील 1 कोटी 29 लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची तयारी सुरू
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गरिबांच्या खात्यात 8000 रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. या घोषणेमुळे उत्तर प्रदेशसारख्या राज्यात काँग्रेसला मदत झाली. हे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील शिंदे सरकारही (CM Eknath Shinde) अशीच योजना आखत आहे, जी आगामी निवडणुकीत फायदेशीर ठरू शकते. विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राची नवी योजना सुरू होण्याची अपेक्षा आहे. राज्यभरातील गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांना आर्थिक दिलासा आणि मदत देण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.