मुंबई (Asha Bhosle Passed Away) : प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. शनिवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु सर्वतोपरी प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही. त्यांचे पुत्र, आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची बातमी दिली.
तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 12, 2026
आशाताईंचा आवाज म्हणजे… pic.twitter.com/pAcDLxeXqo
शासकीय सन्मानाने होणार अंत्यसंस्कार
राज्यमंत्री आशिष शेलार म्हणाले की, "आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र एका युगाच्या समाप्तीबद्दल शोक व्यक्त करत आहे. त्यांचे कार्य आणि संगीत केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी आनंदाचा स्रोत होते. उद्या, सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत, त्यांचे चाहते लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शन घेऊ शकतील. दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्यावर पूर्ण शासकीय सन्मानाने अंतिम संस्कार केले जातील."
Mumbai, Maharashtra: State Cabinet Minister Ashish Shelar says, "Today, the entire country and Maharashtra are mourning the end of an era. Her work and her music were a source of joy not only for India but for the entire world...Tomorrow, from 11 am to 3 pm, her loved ones will… https://t.co/enJlEizboY pic.twitter.com/XnIgTAoQ0Z
— ANI (@ANI) April 12, 2026
आशा भोसले यांची नात जनाई भोसले यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले की, छातीच्या संसर्गामुळे आशा भोसले यांना शनिवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले.
प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले म्हणाले की, "आज माझ्या आईचे निधन झाले. त्या राहत असलेल्या लोअर परेलमधील 'कासा ग्रांडे' येथे उद्या सकाळी 11 वाजता लोक त्यांना अंतिम दर्शन घेऊ शकतात. उद्या दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील."