विद्यार्थिनी विनयभंग प्रकरण

आश्रमशाळेतील तब्बल 21 विद्यार्थिनींचा विनयभंग

Student Modesty Case: तालुक्यातील एका शासकीय आदिवासी आश्रमशाळेत २१ विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा जागी झाली आहे.

आश्रमशाळेतील तब्बल 21 विद्यार्थिनींचा विनयभंग

Student Modesty Case

५९ वर्षीय कर्मचाऱ्याला अटक, सेवेतून निलंबित; अधीक्षिकेवरही ठपका

शहापूर (Student Modesty Case) : तालुक्यातील एका शासकीय आदिवासी आश्रमशाळेत २१ विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा जागी झाली आहे. आदिवासी विकास प्रकल्प विभागाने विद्यार्थिनींच्या विनयभंगाची तक्रार दडपल्याचा ठपका अधीक्षिका गौरी सारक्ते यांच्यावर ठेवला असून या घटनेला त्यांना जबाबदार धरण्यात आले आहे. तर मुलींचा विनयभंग करणारा स्वयंपाकगृहातील मदतनीस गणपत गवळी याला निलंबित केले आहे. विशेष म्हणजे, अशाच गुन्ह्यातून गवळी याची निलंबित होण्याची ही दुसरी वेळ आहे.

शहापूरच्या आश्रमशाळेत काही दिवसांपूर्वी स्वयंपाकगृहात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या गवळीने विद्यार्थिनींचा विनयभंग (Student Modesty Case) केल्याची घटना घडली होती. या मुली जेवण झाल्यानंतर ताट धुण्यासाठी जात असताना त्यांच्या अंगाला आरोपीने विचित्र पद्धतीने स्पर्श केले, त्यामुळे धास्तावलेल्या विद्यार्थिनींनी आश्रमशाळेच्या अधीक्षिका गौरी सारक्ते यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली; मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

अखेर या मुलींनी एका शिक्षकाला घडलेली घटना सांगितली. या शिक्षकाने आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांना हा प्रकार कळवला. त्यानंतर मुख्याध्यापक दीपक पाटील यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. (Student Modesty Case) विद्यार्थिनींच्या विनयभंगाची अधीक्षिका सारक्ते यांनी दखल न घेतल्याने चौकशी समितीने त्यांच्यावर तक्रार दडपल्याचा ठपका ठेवला आहे.

या समितीत सहाय्यक प्रकल्प अधिकारी, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व मुख्याध्यापिका यांचा समावेश आहे. दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थांनी केली आहे.

संबंधित सामग्री

उज्जैनच्या शाही मशिदीवरून तणाव; दगडफेकीनंतर पोलिसांचा अश्रुधुराचा वापर

उज्जैनच्या शाही मशिदीवरून तणाव; दगडफेकीनंतर पोलिसांचा अश्रुधुराचा वापर

उज्जैनच्या शाही मशिदीचा भाग हटवण्यावरून आंदोलन, दगडफेक आणि तणाव. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते रुंदीकरणाचा मुद्दा चर्चेत.

Sep 28, 2026
मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आणलेला १.१३ कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त; FDAचा ६ तास थरारक पाठलाग

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आणलेला १.१३ कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त; FDAचा ६ तास थरारक पाठलाग

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आणला जाणारा १.१३ कोटींचा प्रतिबंधित गुटखा FDAने जप्त केला. सहा तासांच्या पाठलागानंतर ट्रक ताब्यात; चौघांवर गुन्हा दाखल.

Sep 20, 2026
विषारी दारूने घेतले 11 बळी;  सागर प्रकरणात 4 अधिकाऱ्यांवर कारवाई

विषारी दारूने घेतले 11 बळी; सागर प्रकरणात 4 अधिकाऱ्यांवर कारवाई

Sagar toxic liquor case: बंडा तहसील परिसरात विषारी दारू प्यायल्याने तब्बल 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी कठोर भूमिका घेतली

Sep 07, 2026
न्यायिक अधिकाऱ्यांसाठी मोठी बातमी; निवृत्तीचे वय ६० वरून ६२ करण्याचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

न्यायिक अधिकाऱ्यांसाठी मोठी बातमी; निवृत्तीचे वय ६० वरून ६२ करण्याचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

देशातील जिल्हा न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर खटले प्रलंबित असताना न्यायव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Sep 05, 2026
शिवसेनेचा देशभर विस्तार; एकनाथ शिंदेंचा राज्यप्रमुखांना ‘कृती आराखड्या’चा आदेश

शिवसेनेचा देशभर विस्तार; एकनाथ शिंदेंचा राज्यप्रमुखांना ‘कृती आराखड्या’चा आदेश

महाराष्ट्राच्या राजकारणात आपला प्रभाव निर्माण केलेल्या शिवसेनेची संघटनात्मक ताकद आता देशातील अन्य राज्यांमध्ये वाढवण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत.

Sep 04, 2026