BEST Employees

BEST कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; ३८ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तीन महत्त्वाच्या शिफारशींना मंजुरी

बेस्ट उपक्रमातील हजारो कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांच्या वेतनाशी संबंधित महत्त्वाच्या प्रस्तावांना बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

BEST कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; ३८ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तीन महत्त्वाच्या शिफारशींना मंजुरी

BEST Employees

सातवा वेतन आयोग, ‘समान कामास समान वेतन’ आणि नैमित्तिक कर्मचाऱ्यांच्या काल्पनिक वेतनाचा प्रस्ताव; अंतिम मंजुरीसाठी विशेष अभ्यास समितीकडे पाठवणार

बेस्ट उपक्रमातील हजारो कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांच्या वेतनाशी संबंधित महत्त्वाच्या प्रस्तावांना बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर सुधारित वेतनश्रेणी, कंत्राटी कामगारांना समान कामासाठी समान वेतन आणि नैमित्तिक कर्मचाऱ्यांचे काल्पनिक वेतन निश्चित करण्याच्या तीन प्रमुख शिफारशींचा यात समावेश आहे. या निर्णयामुळे ३८ हजारांपेक्षा अधिक नियमित आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे.

मात्र, या शिफारशींची अंमलबजावणी होण्यासाठी अंतिम मंजुरी आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित प्रस्ताव महापालिका आणि राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष अभ्यास समितीकडे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील निर्णयाकडे बेस्ट कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर सुधारित वेतनश्रेणी

बेस्ट कर्मचाऱ्यांना राज्य सरकार आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या समकक्ष सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. २०१६ ते २०२५ या नऊ वर्षांच्या कालावधीसाठी सुधारित वेतन करार करण्याचा प्रस्ताव आहे.

या शिफारशीचा फायदा सुमारे २७ हजार बेस्ट कर्मचाऱ्यांना होण्याची शक्यता आहे. सुधारित वेतनश्रेणी लागू केल्यास बेस्ट उपक्रमावर तब्बल ६ हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ‘समान काम, समान वेतन’

वेट लीजवर कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांसाठीही वेतनवाढीशी संबंधित महत्त्वाची शिफारस करण्यात आली आहे. महाराष्ट्र कंत्राटी कामगार नियम, १९७१ मधील तरतुदींच्या आधारे कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे समान स्वरूपाचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना समान वेतन देण्याचा प्रस्ताव आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास जवळपास ९ हजार कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ होऊ शकते. त्यासाठी बेस्ट उपक्रमावर दरवर्षी सुमारे ४७५ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.

२,२०० नैमित्तिक कामगारांना काल्पनिक वेतनाचा लाभ

उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्च २०१६ पासून सेवेत सामावून घेण्यात आलेल्या २,२०० नैमित्तिक कामगारांच्या वेतनाबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांसाठी काल्पनिक वेतन निश्चित केले जाणार आहे.

प्रत्यक्ष सेवेत रुजू झाल्याच्या तारखेपासून हे वेतन निश्चित करण्याची तरतूद करण्यात आली असून, त्यासाठी कोणतीही थकबाकी दिली जाणार नाही. या निर्णयामुळे अंदाजे ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

आता बेस्ट समितीने मंजूर केलेल्या या तीनही शिफारशींना महापालिका आणि राज्य सरकारच्या विशेष अभ्यास समितीकडून अंतिम मंजुरी कधी मिळते, याकडे ३८ हजारांहून अधिक कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026