भिवंडी मध्ये मूलचंद कंपाऊंडमधील ऑइलच्या गोदामाला भीषण आग; संपूर्ण कारखाना जळून खाक

भिवंडी तालुक्यातील खाडीपार परिसरातील मूलचंद कंपाऊंड येथे असलेल्या ऑइलच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

भिवंडी मध्ये मूलचंद कंपाऊंडमधील ऑइलच्या गोदामाला भीषण आग; संपूर्ण कारखाना जळून खाक

Bhiwandi Fire​​​​​​​

भिवंडी (Bhiwandi Fire) : भिवंडी तालुक्यातील खाडीपार परिसरातील मूलचंद कंपाऊंड येथे असलेल्या ऑइलच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या गोदामात मोठ्या प्रमाणात ऑइलचे ड्रम साठवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे आग लागल्यानंतर काही क्षणांतच तिने विक्राळ रूप धारण केले.

मिळालेल्या माहितीनुसार, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा असल्याने आग वेगाने पसरत संपूर्ण कारखान्याला वेढा घालत अखेर संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. आगीची तीव्रता इतकी होती की धुराचे प्रचंड लोट आकाशात उसळताना दूरवरूनही दिसत होते.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची एक गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून, आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आग नियंत्रणात आणण्यासाठी आणखी गाड्यांची मदत घेण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, प्रशासनाकडून आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून, परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून सतर्कता ठेवण्यात आली आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026