SIR 2026

SIR नंतर आता मतदारांनी जागे व्हा; आपले नाव तपासा!

SIR 2026: SIR-२०२६ अंतर्गत मतदार यादीच्या पुनरीक्षणाची प्रक्रिया झाल्यानंतर आता राज्यातील प्रत्येक मतदारासाठी एक महत्त्वाचे काम बाकी आहे—आपले नाव आणि मतदार यादीतील माहिती स्वतः तपासणे..

SIR नंतर आता मतदारांनी जागे व्हा; आपले नाव तपासा!

SIR 2026

नाव गायब आहे? नावात चूक आहे? पत्ता किंवा मतदान केंद्र बदलले आहे?

योग्य फॉर्म भरून दुरुस्तीची संधी; बीएलओ, डीएलएची मदत घेता येणार

संजय तिगावकर
वर्धा (SIR 2026) :
SIR-२०२६ अंतर्गत मतदार यादीच्या पुनरीक्षणाची प्रक्रिया झाल्यानंतर आता राज्यातील प्रत्येक मतदारासाठी एक महत्त्वाचे काम बाकी आहे—आपले नाव आणि मतदार यादीतील माहिती स्वतः तपासणे. आपले नाव यादीत आहे का, नावातील अक्षरे बरोबर आहेत का, पत्ता योग्य आहे का, कुटुंबातील सर्व पात्र सदस्यांची नावे आहेत का, तसेच मतदान केंद्रात बदलाची गरज आहे का, याची खात्री नागरिकांनी करून घ्यावी.

SIR नंतर एखाद्या (SIR 2026) पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत दिसत नसेल तर फॉर्म ६ भरून नाव नोंदवता येते. यादीतील एखाद्या नावावर हरकत घ्यायची असेल किंवा नाव वगळण्याची आवश्यकता असेल तर फॉर्म ७ वापरता येतो. तर नाव, पत्ता किंवा इतर तपशीलात दुरुस्ती करायची असेल अथवा स्थलांतरामुळे मतदार नोंद दुसऱ्या ठिकाणी हलवायची असेल तर फॉर्म ८ भरता येतो. सर्वसामान्य मतदारांनी हे लक्षात ठेवणे सोपे आहे—नाव नाही तर फॉर्म ६; नावावर हरकत किंवा नाव वगळायचे असेल तर फॉर्म ७; नाव आहे पण दुरुस्ती किंवा स्थलांतर करायचे असेल तर फॉर्म ८.

ही (SIR 2026) प्रक्रिया अवघड वाटत असल्यास नागरिकांनी आपल्या भागातील बीएलओ यांच्याशी संपर्क साधावा. मतदार यादीतील नाव तपासण्यापासून योग्य फॉर्म कोणता, याबाबतची माहिती घेण्यापर्यंत बीएलओची मदत घेता येईल. तसेच संबंधित राजकीय पक्षाच्या डीएलए शी संपर्क साधल्यासही दावा-हरकतीची प्रक्रिया समजून घेणे सोपे होऊ शकते.

विशेषतः नुकतेच १८ वर्षे पूर्ण झालेले युवक, विवाहानंतर किंवा नोकरी-व्यवसायामुळे स्थलांतरित झालेले नागरिक, तसेच पत्ता बदललेले मतदार यांनी आपली नोंद आवर्जून तपासावी. केवळ स्वतःचे नव्हे, तर घरातील प्रत्येक पात्र मतदाराचे नाव तपासणे गरजेचे आहे. दावे व हरकतींची प्राथमिक कार्यवाही मतदार नोंदणी अधिकारी स्तरावर होते. त्यानंतर नियमानुसार पुढील अपीलाचीही व्यवस्था आहे. (SIR 2026) मतदानाच्या दिवशी नाव शोधण्याची वेळ येऊ नये. आजच मतदार यादी तपासा; नाव नसेल तर नोंदणी करा, चूक असेल तर दुरुस्ती करा आणि गरज असल्यास हरकत नोंदवा.

संबंधित सामग्री

उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

मराठवाडा पदवीधर मतदार यादीत ‘उद्धव मस्के’ऐवजी उद्धव ठाकरे यांचे नाव आल्याचा दावा. दिलीप घुगे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली.

Oct 05, 2026
ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांविरोधात याचिका; SIR चौकशीसाठी स्वतंत्र समितीची मागणी

ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांविरोधात याचिका; SIR चौकशीसाठी स्वतंत्र समितीची मागणी

SIR प्रक्रियेतील अनियमिततेविरोधात कोल्हापूर खंडपीठात याचिका. स्वतंत्र समिती, मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी.

Sep 26, 2026
'तुमचे आजोबा-खापर पणजोबा होते का?’ फॉर्म-६वरून राऊतांचा ज्ञानेश कुमार यांना संतप्त सवाल

'तुमचे आजोबा-खापर पणजोबा होते का?’ फॉर्म-६वरून राऊतांचा ज्ञानेश कुमार यांना संतप्त सवाल

फॉर्म-६ बदल आणि निवडणूक आयोगातील मतभेदांवरून संजय राऊत आक्रमक; ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग आणण्याची घोषणा.

Sep 24, 2026

रिसोड विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी शिबिरे ठरतायत ‘फार्स’; केंद्रांवर बीएलओ गायब, नवीन मतदार नोंदणीविनाच परतले

रिसोड विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी शिबिरे ठरतायत ‘फार्स’; केंद्रांवर बीएलओ गायब, नवीन मतदार नोंदणीविनाच परतले

रिसोड विधानसभा मतदारसंघातील विशेष मतदार नोंदणी शिबिरांमध्ये काही केंद्रांवर बीएलओ गैरहजर असल्याने नागरिकांना नोंदणीविनाच परतावे लागल्याचा आरोप. उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशी व कारवाईचे आश्वासन दिले.

Sep 19, 2026