स्वयपूर्णतेचा नवा आदर्श 

गॅस सिलेंडरला रामराम: चोरमले, देशमुख यांची शेणापासून गोबर गॅस निर्मिती

Gobar Gas Production: पानकनेरगावातील शेतकर्यांनी गोबर गॅस प्रकल्प उभारला आहे, ज्यामुळे गॅस सिलेंडरच्या खर्चात मोठी बचत झाली आहे आणि स्वयंपूर्ण जीवनशैली निर्माण केली आहे.

गॅस सिलेंडरला रामराम: चोरमले, देशमुख यांची शेणापासून गोबर गॅस निर्मिती

Gobar Gas Production

 

दररोजच्या इंधन खर्चाला आळा: शेतकऱ्यांनी उभारला गोबर गॅस प्रकल्प

४० किलो शेणातून दररोज मिळतो एक किलो गॅस 

इंदूजा महिला मिल प्रोड्यूसर योजनेतून घेतला लाभ

सेनगाव (Gobar Gas Production) : पानकनेरंगाव  भारत हा आजही कृषी प्रधान देश आहे. या ठिकाणीची ८५ टक्के लोकसंख्या आजही शेती आणि शेती पुरक उद्योगांवर अवलंबून आहे. कोट्यावधी शेतकरी पशुपालन व्यवसायाशी निगडीत आहेत. त्याच्यावर त्यांची उपजीविका चालते. कोणी दूध विक्रीसाठी गाय-म्हशींचा गोठा करतात. तर काही जण दूध डेअरी आणि इतर मिठाईच्या व्यवसायात आहेत. दूध,दही, पनीर यांचा मोठा व्यवसाय आहे. दुग्धजन्य उत्पादन विक्रीतून अनेक जण मालामाल झाले आहेत. गायी-म्हशींचे शेण सुद्धा शेती व तसेच घर स्वयंपाक साठी पूरक असते. हे एका शेतकर्यांनी दाखवून दिले.

सध्या देशभरात एलपीजी गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे

नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Gobar Gas Production) गॅस मिळवण्यासाठी तासन्‌तास रांगा, वाढलेला खर्च आणि अनिश्चितता यामुळे ग्रामीण भागातही संकट निर्माण झाले आहे. घरगुती वापराच्या गॅसच्या दरांत मोठी वाढ झाल्यामुळे स्वयंपाकासाठी गॅस वापरणं परवडत नसल्याचं बोलताना हे सूद्धा अनेकांककडून ऐकलं असेल. परंतु, पानकनेरंगाव येथील दोन शेतकऱ्यानं यावर एक शक्कल लढवत या समस्येवर प्रगतिशील शेतकऱ्याने शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपाय शोधून काढत आत्मनिर्भरतेचा आदर्श निर्माण केला आहे. सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील शेतकरी मिराबाई प्रकाश चोरमले, व तसेच शांताबाई दिलीपराव देशमुख यांनी इंदूजा महिला मिल योजनेतून (Gobar Gas Production) गोबरगॅस प्रकल्प उभारला आहे.

या प्रकल्पातून आपल्या शेतातील जनावरांच्या शेणाचा उपयोग करून, गॅसची निर्मिती केली आहे. नूकत्याच दोन महिन्यांपासून घरात गोबर गॅस वापरत आहेत. या गोबर गॅस ला 
७ बाय १० आणि खोली ३ फूट या पद्धतीने हा गोबर गॅस तयार करण्यात आला तसेच हे युनिट ७ ते ८ वर्षापर्यंत टिकू शकते असे शेतकऱ्याकडून सांगण्यात आले व तसेच दररोज ४० किलो १०० लिटर पाणी यापासून मिळणाऱ्या इंधनावर दररोज ३ वेळ १० माणसांचा स्वयंपाक होत आहे. तसेच गॅस तयार झाल्यानंतर त्यापासून मिळणारी स्लरी ही शेतात उत्तम प्रकारे खत म्हणून वापरण्यात उपयोगी ठरते असे शेतकरी सांगतात.

घरगुती सिलेंडरचे दर पाहता शेतकरी दिलीपराव देशमुख यांची वर्षाला २८ हजार रुपये पर्यंत बचत  होणार असल्याचे सांगितले जात आहे.  या (Gobar Gas Production) प्रकल्पातून तयार होणाऱ्या गोबर गॅसवर त्यांच्या कुटुंबाचा दैनंदिन स्वयंपाक सहजपणे केला जात असून, एलपीजी सिलिंडरवरील अवलंबित्व पूर्णतः कमी झाले आहे.

कमी खर्चात जास्त फायदा

या (Gobar Gas Production) बायोगॅस प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यल्प संसाधनांतही त्याची कार्यक्षमता. एका जनावराच्या दररोज मिळणाऱ्या शेणातूनही पुरेशा प्रमाणात गॅस निर्मिती होत असल्याने छोट्या शेतकऱ्यांसाठीही हा पर्याय सहज शक्य आहे. यामुळे घरगुती इंधनाचा खर्च शून्यावर आला असून, कुटुंबाला स्वयंपूर्णता मिळाली आहे.

शेतीसाठीही दुहेरी लाभ

गोबरगॅस निर्मितीनंतर (Gobar Gas Production) उरलेले शेण सेंद्रिय खत  व स्लरी म्हणून वापरले जात आहे.  गोबर गॅस हा पूर्णतः प्रदूषणमुक्त, सुरक्षित आणि आरोग्यास हितकारक इंधन आहे. पारंपारिक इंधनांच्या तुलनेत धूर नसल्यामुळे महिलांच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होत आहे. तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्यासही हा प्रकल्प उपयुक्त ठरत आहे.

स्वयंपूर्णतेचा नवा आदर्श

या (Gobar Gas Production) प्रयोगातून ग्रामीण भागात स्थानिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून स्वयंपूर्ण जीवनशैली कशी निर्माण करता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे. इंधन टंचाईच्या काळात हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या दारात जनावरे आहेत, त्यांनी शेणापासून गोबर गॅसची निर्मिती करून त्याचा वापर करावा. शेतकऱ्यांनी जास्त गॅसचा वापर होण्याकरता शेणापासून तयार होणाऱ्या गोबर गॅसचा वापर करावा. जेणेकरून तुमचं आरोग्य देखील चांगलं राहतं आणि गॅसवर होणारा खर्च देखील कमी होतो. तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक बचतही होते, असंही देशमुख यांनी सांगितलं. विशेष म्हणजे पानकनेरगावात शांताबाई दिलीपराव देशमुख, आणि मीराबाई प्रकाश चोरमले या शेतकर्यांनी इंदूजा महिला मिल योजनेतून लाभ घेऊन गॅस सिलेंडरला फाटा देत एक दिशा दाखवली

संबंधित सामग्री

ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; कमर्शियल सिलेंडर 62.50 रुपयांनी महाग

ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; कमर्शियल सिलेंडर 62.50 रुपयांनी महाग

ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी कमर्शियल LPG सिलेंडर 62.50 रुपयांनी महागला. दिल्लीतील 19 किलोचा सिलेंडर 2810 रुपयांवर पोहोचला, तर घरगुती सिलेंडरचे दर स्थिर आहेत.

Oct 01, 2026
LPG बाबत नवे नियम; अनुदानासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य!

LPG बाबत नवे नियम; अनुदानासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य!

LPG Aadhaar Biometric: ऑक्टोबर 2026 पासून अनुदानासह नियंत्रित दरात एलपीजी रिफिल मिळवण्यासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण (BAA) पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले: पेट्रोलियम- नैसर्गिक वायू मंत्रालय

Sep 21, 2026
दाटेगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची राज्यस्तरीय पाहणी

दाटेगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची राज्यस्तरीय पाहणी

ताओ दाटेगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय पाहणी समितीने ५ सप्टेंबर, शनिवार रोजी पाहणी केली.

Sep 05, 2026
पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; LPG महागला, मुंबईत CNG-PNG दरवाढ

पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; LPG महागला, मुंबईत CNG-PNG दरवाढ

महिन्याच्या सुरुवातीलाच वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Sep 01, 2026
आमदार सावरकर विकासासाठी झटणारा धडपडया माणूस: शंकरराव वाकोडे

आमदार सावरकर विकासासाठी झटणारा धडपडया माणूस: शंकरराव वाकोडे

MLA Savarkar: आमदार सावरकरांनी पांदन शेत रस्त्यांचे रूपांतर डांबरीकरण रस्त्यात करून, शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी निगडित असलेली समस्या कायम स्वरूपात सोडविल्याने आमदार सावरकरांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

Aug 30, 2026