LPG e-KYC

LPG ग्राहकांसाठी मोठी सूचना! १५ ऑगस्टपूर्वी e-KYC पूर्ण करा; अन्यथा रिफिल बुकिंग आणि सिलेंडरवर होऊ शकतो परिणाम

देशभरातील घरगुती LPG गॅस ग्राहकांसाठी गॅस कंपन्यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे.

LPG ग्राहकांसाठी मोठी सूचना! १५ ऑगस्टपूर्वी e-KYC पूर्ण करा; अन्यथा रिफिल बुकिंग आणि सिलेंडरवर होऊ शकतो परिणाम

LPG e-KYC

गॅस कंपन्यांचे घरगुती कनेक्शनधारकांना आवाहन; वेळेत e-KYC न केल्यास व्यावसायिक दराने सिलेंडर घ्यावा लागू शकतो

देशभरातील घरगुती LPG गॅस ग्राहकांसाठी गॅस कंपन्यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. सर्व घरगुती गॅस कनेक्शनधारकांनी १५ ऑगस्टपूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. निर्धारित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास ग्राहकांना घरगुती सिलेंडरऐवजी व्यावसायिक (Commercial) दराने सिलेंडर घ्यावा लागू शकतो किंवा गॅस रिफिल बुकिंग करताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

गॅस कंपन्यांच्या माहितीनुसार, e-KYC मोहिमेचा मुख्य उद्देश प्रत्येक गॅस कनेक्शनची अचूक पडताळणी करणे, बनावट किंवा अनधिकृत कनेक्शन रोखणे आणि सरकारी अनुदान योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल याची खात्री करणे हा आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व वितरकांना १५ ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त ग्राहकांचे e-KYC पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अनेक भागांमध्ये अद्याप मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी e-KYC केलेले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गॅस एजन्सींकडून ग्राहकांना फोन कॉल, एसएमएस तसेच प्रत्यक्ष संपर्क साधून ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. काही ग्राहकांना LPG Refill Booking तात्पुरते ब्लॉक होऊ शकते, अशा आशयाचे संदेशही मोबाईलवर मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.

e-KYC कशी पूर्ण कराल?

ग्राहक आपल्या जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन किंवा संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत ऑनलाइन सुविधेचा वापर करून e-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यासाठी आधार कार्ड, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक तसेच आवश्यक ओळखपत्रांची पडताळणी केली जाते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित गॅस कनेक्शनची माहिती अद्ययावत केली जाते.

गॅस कंपन्या आणि वितरकांनी सर्व ग्राहकांना १५ ऑगस्टपूर्वी e-KYC पूर्ण करण्याचे आवाहन केले असून, भविष्यातील गैरसोय टाळण्यासाठी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे.

संबंधित सामग्री

LPG बाबत नवे नियम; अनुदानासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य!

LPG बाबत नवे नियम; अनुदानासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य!

LPG Aadhaar Biometric: ऑक्टोबर 2026 पासून अनुदानासह नियंत्रित दरात एलपीजी रिफिल मिळवण्यासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण (BAA) पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले: पेट्रोलियम- नैसर्गिक वायू मंत्रालय

Sep 21, 2026
आधार कार्डातील जन्मतारीख बदलायची आहे? UIDAI च्या नियमांनुसार या गोष्टी लक्षात ठेवा

आधार कार्डातील जन्मतारीख बदलायची आहे? UIDAI च्या नियमांनुसार या गोष्टी लक्षात ठेवा

आधार कार्डमध्ये जन्मतारीख चुकीची नोंद झाल्यानंतर ती दुरुस्त करण्याची प्रक्रिया प्रत्येक वेळी सारखी राहात नाही.

Sep 02, 2026
घरगुती गॅस ग्राहकांसाठी मोठी अपडेट; e-KYC ची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढली

घरगुती गॅस ग्राहकांसाठी मोठी अपडेट; e-KYC ची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढली

घरगुती LPG सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Aug 27, 2026
हिंगोलीत १५ ऑगस्टला विश्व हिंदू परिषद-बजरंग दलातर्फे भव्य महाआरती

हिंगोलीत १५ ऑगस्टला विश्व हिंदू परिषद-बजरंग दलातर्फे भव्य महाआरती

हिंगोली शहरात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘अखंड भारताचा संकल्प’ घेऊन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

Aug 14, 2026
१५ ऑगस्टला लातूरमध्ये ‘स्वरविलास संगीत दरबार’; अभिजात शास्त्रीय संगीताची सुरेल मेजवानी

१५ ऑगस्टला लातूरमध्ये ‘स्वरविलास संगीत दरबार’; अभिजात शास्त्रीय संगीताची सुरेल मेजवानी

राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते दिवंगत विलासराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लातूरमध्ये ‘स्वरविलास संगीत दरबार’ या अभिजात शास्त्रीय संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.

Aug 10, 2026