महाराष्ट्र दुष्काळ जीआर

शासनाच्या जीआरची शिवसेनेने केली होळी

Maharashtra Drought GR: शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत ट्रिगरच्या नावाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची जीआरच्या माध्यमातून थट्टा केल्याचा जाहीर निषेध करीत शिवसेना

शासनाच्या जीआरची शिवसेनेने केली होळी

Maharashtra Drought GR

 

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर सरकारने मीठ चोळल्याचा आरोप

अहमदपूर (Maharashtra Drought GR) : शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत ट्रिगरच्या नावाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची जीआरच्या माध्यमातून थट्टा केल्याचा जाहीर निषेध करीत शिवसेनेने अहमदपूर तहसीलसमोर शासनाच्या (Maharashtra Drought GR) जीआरची होळी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.२८) हे आंदोलन करण्यात आले.

पावसाअभावी खरीप गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त असताना राज्य शासन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आल्याचे नाटक करीत आहे. ट्रिगरच्या नावाखाली जीआर काढून शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे, जीपीएस फोटो काढण्याचे आदेश देत आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमधील पीक वाळून गेल्यामुळे काढून टाकले आहे. काढलेल्या पिकाचे पंचनामे करणे म्हणजे सरकारचा निगरगट्ट फार्स आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा मोठा प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांनी फसव्या घोषणा करून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे, असा आरोप  यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर, तालुकाप्रमुख दत्ता हेंगणे, माजी तालुका प्रमुख विलास पवार हांगरगेकर, तालुका संघटक तथा एस. टी. कामगार सेना प्रमुख मार्गदर्शक अनिकेत फुलारी, उपतालुकाप्रमुख गणेश माने, लहू बारवाड, संतोष आदटराव, पवन देऊळकर, पद्माकर पेंढारकर, जिल्हा कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले, किसान सेना तालुका प्रमुख सुधाकर जायभाये, दत्ता कदम, भगवान कदम, सोमनाथ आढाव, शिवकुमार बेद्रे, बाळासाहेब पडीले, माऊली देवकत्ते, विभाग प्रमुख गजानन येन्ने, निलकंठ आलापुरे,उपविभाग प्रमुख व्यंकट सुरकुटे, रवी चामवाड, गोविंद पवार, गंगाधर कल्याणे, सचिन गुंडरे, मारोती बिराडे, एकनाथ तेलंग, विठ्ठल श्रीमंगले, धनंजय तुडमे, शिवदत्त मद्दे, ऋषिकेश खोमणे, प्रदीप शिंगडे, संतोष सुर्यवंशी, भारत केंद्रे, विनोद वाघमारे, प्रदीप कुकाले, गणेश चव्हाण, गिरीधर भंडे, कृष्णा रोकडे, रवी राचमल्ले, सुरेश अंकुलगे, मुन्ना शेख यांच्यासह शिवसैनिक व शिवसेना सलग्न संघटनेच्या विविध आजी- माजी पदाधिकाऱ्यांची उपस्थित होती.

या आहेत प्रमुख मागण्या...
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करण्यात यावे, विना अट सरसकट हेक्‍टरी एक लाखाची मदत द्यावी, विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोफत शिक्षण द्यावे, इंजिनियरींग, मेडिकलच्या विद्यार्थ्यांची महाविद्यालय व वसतिगृहाची फिस माफ करावी, जनावरांना चारा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, पीक विमा, अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या (Maharashtra Drought GR) शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. नुसत्या फसव्या घोषणा करून शेतकऱ्यांची थट्टा करू नका, गेल्या चोवीस तासात सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, याला जबाबदार महायुती सरकार आहे, असा घणाघाती आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी यावेळी केला.

संबंधित सामग्री

दुष्काळीच्या पंचनाम्याच्या जीआरची शिवसेना ठाकरे गटाकडून होळी

दुष्काळीच्या पंचनाम्याच्या जीआरची शिवसेना ठाकरे गटाकडून होळी

Drought Damage GR: राज्य सरकारने  दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या जीआरमध्ये शेतकर्‍यांना ठोस आर्थिक मदतीची तरतूद नसल्याचा आरोप करीत शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने जीआर

Sep 28, 2026
घोषणांचा पाऊस नको, अंमलबजावणी कधी? ते सांगा!

घोषणांचा पाऊस नको, अंमलबजावणी कधी? ते सांगा!

औसा तालुक्यातील तावशी (ताड) येथे आदित्य ठाकरेंनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

Sep 27, 2026
जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिलासा!

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिलासा!

सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे.

Sep 05, 2026
लातूर महापालिकेतील काम बंद आंदोलन स्थगित!

लातूर महापालिकेतील काम बंद आंदोलन स्थगित!

Latur Municipal Protest: लातूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव यांच्या कक्षामध्ये पालिका नगररचना विभागाचे प्रमुख अक्षय तळदकर यांना झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ

Aug 19, 2026
राज्यातील ११६ दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद

राज्यातील ११६ दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद

महाराष्ट्र शासनाने महसूल विभागाच्या अखत्यारीतील राज्यातील सर्व दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Jun 12, 2026