महाराष्ट्र वीज दर

आनंदाची बातमी: 1 एप्रिलपासून नवीन वीज दर लागू होणार

Maharashtra Electricity Tariff: महाराष्ट्रात १ एप्रिल २०२६ पासून नवीन वीज दर लागू होणार ज्याचा फायदा घरगुती, औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना होईल. स्मार्ट मीटर वापरणाऱ्यांना विशेष सवलत.

आनंदाची बातमी: 1 एप्रिलपासून नवीन वीज दर लागू होणार

Maharashtra Electricity Tariff Cut 2026

स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांना मिळणार अधिक फायदा

मुंबई (Maharashtra Electricity Tariff Cut 2026) : वीज बिलांमुळे त्रस्त असलेल्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रदीर्घ कायदेशीर प्रक्रिया आणि सुनावणीनंतर, महाराष्ट्र सरकारने आता वीज दर कमी करण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल 2026 पासून लागू होणाऱ्या या निर्णयाचा फायदा घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक या तिन्ही प्रकारच्या ग्राहकांना होणार आहे. 

1 एप्रिल 2026 पासून, स्मार्ट मीटर वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज (Maharashtra Electricity Tariff)  वापरावर मोठी सवलत मिळेल. पूर्वी ही सवलत प्रति युनिट 80 पैसे होती, पण आता ती वाढवून 85 पैसे करण्यात आली आहे. स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेतील वीज वापरासाठी प्रति युनिट 80 पैशांऐवजी 85 पैशांची विशेष सवलत मिळेल. यामुळे दिवसाचा वीज वापर स्वस्त होणार आहे.

नवीन दरांचा उद्योग आणि व्यवसायांना किती फायदा?

हा निर्णय औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठीही खूप फायदेशीर आहे. त्यांना एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत 15% पर्यंत सूट मिळेल, तर ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत 25% पर्यंत सूट मिळेल. यामुळे उत्पादन खर्च कमी होईल आणि व्यवसायाला चालना मिळेल. याव्यतिरिक्त, उच्च-दाब औद्योगिक ग्राहकांसाठी वीज दर प्रति युनिट ₹10.78 वरून ₹10.71 पर्यंत कमी करण्यात आला आहे.

घरगुती ग्राहकांसाठी वीज किती स्वस्त होणार?

वीज दरातील कपातीचा थेट फायदा सर्वसामान्य जनतेला होईल. 100 युनिटपर्यंत (Maharashtra Electricity Tariff)  वीज वापरणाऱ्यांसाठी दर प्रति युनिट ₹7.31 वरून ₹7.10 पर्यंत कमी होईल. 100 ते 300 युनिट वापरणाऱ्यांसाठी दर प्रति युनिट ₹13.17 वरून ₹12.94 पर्यंत कमी होईल.

पुढील पाच वर्षांत वीज इतकी स्वस्त होणार

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (MERC) महावितरणच्या 2025-26 ते 2029-30 या पंचवार्षिक वीज दर याचिकेला मंजुरी दिली आहे. या (Maharashtra Electricity Tariff)  निर्णयानुसार, 2030 पर्यंत सर्व श्रेणींमधील वीज दरात टप्प्याटप्प्याने कपात केली जाईल आणि कोणत्याही श्रेणीत दरवाढ होणार नाही. सरकारच्या अंदाजानुसार, पुढील पाच वर्षांत वीज दरात अंदाजे 26% घट होऊ शकते.

संबंधित सामग्री

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
Nobel Prize 2026: हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई यांना रसायनशास्त्रातील नोबेल; ‘मिरर इमेज’चे गूढ उकलले

Nobel Prize 2026: हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई यांना रसायनशास्त्रातील नोबेल; ‘मिरर इमेज’चे गूढ उकलले

2026 चा रसायनशास्त्रातील नोबेल हेन्री कागन आणि केन्सो सोई यांना जाहीर; होमोचिरॅलिटीच्या गूढावर केलेल्या संशोधनाचा औषधनिर्मितीला मोठा फायदा.

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
चारधाम यात्रेने रचला नवा विक्रम; भाविकांची संख्या तब्बल 56.18 लाखांपार

चारधाम यात्रेने रचला नवा विक्रम; भाविकांची संख्या तब्बल 56.18 लाखांपार

Chardham Yatra Record: यंदा केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारही धामांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यातील धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटन

Oct 07, 2026