मिठाई, दूध, खाद्यतेल तपासणी

सणासुदीत भेसळखोरांची खैर नाही! तुकाराम मुंढेंची FDA ॲक्शन मोडवर

Tukaram Mundhe: प्रमुख सण आणि सार्वजनिक कार्यक्रम लक्षात घेऊन ‘फेस्टिव्हल एन्फोर्समेंट कॅलेंडर’ तयार करण्यात आले आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून ही विशेष अंमलबजावणी योजना.

सणासुदीत भेसळखोरांची खैर नाही!  तुकाराम मुंढेंची FDA ॲक्शन मोडवर

FDA officer Tukaram munde

 

मिठाई, दूध, खाद्यतेलासह अन्नपदार्थांची तपासणी

मुंबई (Maharashtra FDA) : गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळीसह आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कंबर कसली आहे. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी सणनिहाय तपासणी आणि कारवाईचे नियोजन करण्यात आले आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या पुढाकारातून ही विशेष अंमलबजावणी योजना राबवली जाणार आहे.

सणांच्या काळात मिठाई, दूध, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल तसेच इतर खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. वाढत्या मागणीचा फायदा घेत काही ठिकाणी भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ बाजारात आणले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा उत्पादनांवर FDA कडून विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

यासाठी वर्षभरातील प्रमुख सण आणि सार्वजनिक कार्यक्रम लक्षात घेऊन ‘फेस्टिव्हल एन्फोर्समेंट कॅलेंडर’ तयार करण्यात आले आहे. या (Maharashtra FDA) माध्यमातून संबंधित सणाच्या काळात कोणत्या अन्नपदार्थांची मागणी वाढते, कोणत्या भागात तपासणी आवश्यक आहे आणि कोणत्या प्रकारच्या भेसळीला आळा घालायचा, याचे नियोजन केले जाणार आहे.

‘सण साजरे करण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत, मात्र नागरिकांना सुरक्षित अन्न मिळणे आवश्यक आहे,’ अशी भूमिका FDA आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी मांडली आहे. दरम्यान, अन्न सुरक्षेबरोबरच बेकायदा औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांविरोधातही FDA ने कारवाईचा वेग वाढवला आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत राज्यभरात २,९०२ तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये उत्पादन केंद्रे आणि विक्री आस्थापनांचा समावेश आहे.

या कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन आढळून आले. परिणामी ६७७ परवाने निलंबित, तर २०३ परवाने रद्द करण्यात आले. तसेच बेकायदा औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांचा सुमारे ११.४१ कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. Maharashtra FDA कडून नियमांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांना सहकार्य केले जाईल; मात्र अन्न व औषधांच्या गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया

मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया

मुंबईत रोज १,३९० दशलक्ष लिटरहून अधिक पाणी गळती, चोरी आणि अनधिकृत वापरामुळे वाया जाते. गारगाईसारख्या तीन धरणांच्या क्षमतेइतकी ही नासाडी आहे.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026