विधान परिषद 2026 : महायुतीचा फॉर्म्युला फायनल; 17 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर

 राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीने अखेर जागावाटपाचा तिढा सोडवत 17 जागांसाठी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आहे.

विधान परिषद 2026 : महायुतीचा फॉर्म्युला फायनल; 17 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर

Maharashtra Legislative Council

मुंबई (Maharashtra Legislative Council) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीने अखेर जागावाटपाचा तिढा सोडवत 17 जागांसाठी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपावर एकमत झाले असून निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महायुतीच्या अंतिम फॉर्म्युल्यानुसार भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवणार आहे.

भाजपचे उमेदवार (11 जागा)

मतदारसंघ -  उमेदवार


वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली - अरुण लखाणी

भंडारा-गोंदिया - अविनाश ब्राह्मणकर

अमरावती - प्रवीण पोटे

सोलापूर - राजेंद्र राऊत

सांगली-सातारा - धैर्यशील कदम

अहिल्यानगर - प्राजक्त तनपुरे

छत्रपती संभाजीनगर-जालना - सुहास शिरसाट

नांदेड - अमर राजूरकर

धाराशिव-बीड-लातूर - बसवराज पाटील

जळगाव - नंदकिशोर महाजन

नागपूर - राजीव पोतदार


शिवसेनेचे उमेदवार (4 जागा)

मतदारसंघ - उमेदवार

ठाणे - रवींद्र फाटक
नाशिक - नरेंद्र दराडे
परभणी-हिंगोली - सईद खान
यवतमाळ - दुष्यंत चतुर्वेदी

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार (2 जागा)

मतदारसंघ - उमेदवार

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग - अनिकेत तटकरे
पुणे - विक्रम काकडे

कोणत्या जागेवर आधी कोणाचा आमदार होता?


•    सोलापूर – प्रशांत परिचारक (भाजप)

•    अहिल्यानगर – अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस)

•    ठाणे – रवींद्र फाटक (शिवसेना)

•    जळगाव – चंदूभाई पटेल (भाजप)

•    सांगली-सातारा – मोहनराव कदम (काँग्रेस)

•    नांदेड – अमर राजूरकर (काँग्रेस)

•    यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)

•    पुणे – अनिल भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस)

•    भंडारा-गोंदिया – परिणय फुके (भाजप)

•    रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

•    नाशिक – नरेंद्र दराडे (शिवसेना)

•    वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली – रामदास आंबटकर (भाजप)

•    अमरावती – प्रवीण पोटे (भाजप)

•    धाराशिव-बीड-लातूर – सुरेश धस (भाजप)

•    परभणी-हिंगोली – विप्लव बाजोरिया (शिवसेना)

•    छत्रपती संभाजीनगर-जालना – अंबादास दानवे (शिवसेना)

•    नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)
 

विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम

•    अधिसूचना जाहीर – 25 मे 2026
•    उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 1 जून 2026
•    अर्जांची छाननी – 2 जून 2026
•    अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत – 4 जून 2026
•    मतदान – 18 जून 2026 (सकाळी 8 ते दुपारी 4)
•    मतमोजणी – 22 जून 2026

विशेष बाब

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत न झाल्यामुळे संबंधित मतदारसंघांतील जागा गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त होत्या. आता निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केल्याने या सर्व 17 जागांवर निवडणूक होणार असून महायुतीने उमेदवारांची घोषणा करून प्रचारालाही सुरुवात केली आहे. राज्यातील राजकीय घडामोडींसाठी या निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

संबंधित सामग्री

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा; राज ठाकरेंनी SIR रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

Oct 04, 2026
लुकआऊट सर्क्युलर, कर्जप्रकरण अन् पासपोर्ट; नितेश राणेंना अखिल चित्रेंनी मागितली उत्तरे

लुकआऊट सर्क्युलर, कर्जप्रकरण अन् पासपोर्ट; नितेश राणेंना अखिल चित्रेंनी मागितली उत्तरे

नितेश राणेंविरोधात लुकआऊट सर्क्युलरचा अखिल चित्रेंचा दावा. DHFL कर्जप्रकरण, 38 गुन्हे आणि पासपोर्टवरून चित्रेंनी सवाल उपस्थित केले.

Oct 03, 2026