सय्यद इमरान अली राजीनामा

वसमतच्या उपनगराध्यक्षांनी दिला राजीनामा

Syed Imran Ali resigns:

वसमतच्या उपनगराध्यक्षांनी दिला राजीनामा

Syed Imran Ali resigns

 

शेतात गोवंश ठेवल्या प्रकरणी दाखल झाला होता गुन्हा

वसमत (Syed Imran Ali resigns) : वसमत नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष सय्यद इमरान अली यांनी मंगळवारी रात्री उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.  नगराध्यक्षांकडे त्यांनी राजीनामा सुपूर्त केला असून राजीनामा मंजूर करण्यात आला असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले आहे. उपनगराध्यक्षांच्या शेतात गोवंश  क्रूरपणे बांधून ठेवल्याचे समोर आले होते त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
 
वसमत नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सय्यद इमरान अली (Syed Imran Ali resigns) मंगळवारी रात्री अचानक उपाध्यक्षपदाचा राजीनामा नगराध्यक्षा सुनीता मनमोहन बाहेती यांच्याकडे सोपवला  नैतिक जबाबदारी, प्रकृती अस्वस्थ व वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देण्याचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. 

जवळा खंदारबन शिवारातील त्यांच्या शेतामध्ये 19 गोवंश क्रूरपणे बांधून ठेवल्याची घटना घडली होती वसमत ग्रामीण पोलिसांनी छापा मारून गोवंश मुक्त केले होते. त्यानंतर शेतमालक सय्यद इमरान अली यांच्या विरोधात वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या घटनेनंतर वसमत येथे सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने तीव्र निषेध नोंदवून वसमत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या बदला मोठा प्रतिसाद मिळाला होता. या घटनेनंतर उलट सुलट चर्चा सुरू होत्या.

त्या पार्श्वभूमीवर सय्यद इमरान अली (Syed Imran Ali resigns) यांनी मंगळवारी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी व दोषी विरोधात कारवाई करावी, अशी मागणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सय्यद इमरान अली यांनी केली होती. उपाध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्षांनी मंजूर केला आहे. उपाध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे नगरपालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संबंधित सामग्री

कर्जमाफी झाली, पैसेही आले; मात्र पीक कर्ज मिळेना! IOB शाखेत शेतकऱ्यांचे चार तास ठिय्या आंदोलन

कर्जमाफी झाली, पैसेही आले; मात्र पीक कर्ज मिळेना! IOB शाखेत शेतकऱ्यांचे चार तास ठिय्या आंदोलन

कर्जमाफीची रक्कम मिळूनही IOB एकलारा शाखेतील २८८ शेतकऱ्यांची खाती बंद नाहीत. नवीन पीक कर्जासाठी चार तास ठिय्या आंदोलनानंतर तातडीच्या कार्यवाहीचे आदेश.

Sep 26, 2026
शेतकरी उन्हात वाट पाहतच राहिले; मुख्यमंत्री न भेटताच निघून गेले!

शेतकरी उन्हात वाट पाहतच राहिले; मुख्यमंत्री न भेटताच निघून गेले!

तावशीतील शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तासन्‌तास उन्हात थांबले; भेट न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत करपलेल्या पिकांची होळी केली.

Sep 24, 2026
चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा

चंद्रपूर-गडचिरोलीतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महेंद्र ब्राह्मणवाडे यांची पत्रकार परिषद; धान खरेदी, नुकसानभरपाई, महामार्ग व रोजगाराच्या मागण्या.

Sep 18, 2026
नागभीडमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा; ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराची मागणी

नागभीडमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा; ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराची मागणी

धान बोनस, ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर आणि २४ तास वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात नागभीडमध्ये हजारो शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा.

Sep 17, 2026
पालकमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पालकमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दौऱ्यापूर्वी नामदेव पतंगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आरोप; जिल्हाभर आंदोलनाचा इशारा.

Sep 16, 2026