खा. रवींद्र चव्हाण 

काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यांची सुरुवात सिडको पासून: खा. रवींद्र चव्हाण 

MP Ravindra Chavan: नांदेड जिल्ह्यात काँग्रेस संघटन मजबूत करण्यासाठी पहिला मेळावा सिडको येथे आयोजित करण्यात आला आहे. खा. रवींद्र चव्हाण ने मेळाव्यांची सुरुवात हाती घेण्याचे आवाहन केले.

काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यांची सुरुवात सिडको पासून: खा. रवींद्र चव्हाण 

MP Ravindra Chavan

नांदेड (MP Ravindra Chavan) : जिल्ह्यातील काँग्रेस संघटन मजबूत करण्याच्या अनुषंगाने व एसआयआर मोहीम यशस्वीपणे राबवून घेण्यासाठी लवकरच जिल्ह्यात अनेक ठिकाणी काँग्रेस मेळावे आयोजित करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून या कार्यक्रमाअंतर्गत पहिला मेळावा सिडको येथे होणार आहे, त्यामुळे सिडकोत काँग्रेस संघटन अधिक व्यापक करावे असे आवाहन दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा खासदार रवींद्र चव्हाण (MP Ravindra Chavan) यांनी केले.

आगामी संघटनात्मक मेळाव्याच्या अनुषंगाने सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीची संघटन बैठक खा. रवींद्र चव्हाण (MP Ravindra Chavan) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे व महानगराध्यक्ष अब्दुल गफार यांनी देखील मार्गदर्शन केले. सिडको ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील यांनी संघटनात्मक कार्य आढावा देत बैठकीचे प्रस्तावित केले.

यादरम्यान नवनिर्वाचित तिनही अध्यक्षांचा सिडको काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी  प्रल्हाद गव्हाणे, डॉ. अशोक कलंत्री, ज्योती कदम, गोपीनाथ कहाळेकर, माणिक श्रोते, किशन रावणगावकर, लतिफ शेख, नरोद्दीन शेख, एसपी कुंभारे, प्रा. गणेश लिंगमपल्ले, भगवान जोगदंड, अजय गालेवाड, सोपान भुरे, अझर शेख, सचिन कानोडे, नईम शेख, चव्हाण काकू, प्रभू उरुद्दवाड आदीसह इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन गौतम पवार यांनी केले.

नाभिक समाजाचे नेते प्रा. गणेश लिंगमपल्ले, विद्यार्थी युवा नेतृत्व सचिन कानोडे, सामाजिक कार्यकर्ते नईम शेख आदी सिडकोतील पदाधिकाऱ्यांनी यावेळी खा. रवींद्र चव्हाण (MP Ravindra Chavan) यांच्या नेतृत्वात व उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल गफार,   सिडको ब्लाँक अध्यक्ष बापूसाहेब पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

संबंधित सामग्री

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा; राज ठाकरेंनी SIR रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

Oct 04, 2026
लुकआऊट सर्क्युलर, कर्जप्रकरण अन् पासपोर्ट; नितेश राणेंना अखिल चित्रेंनी मागितली उत्तरे

लुकआऊट सर्क्युलर, कर्जप्रकरण अन् पासपोर्ट; नितेश राणेंना अखिल चित्रेंनी मागितली उत्तरे

नितेश राणेंविरोधात लुकआऊट सर्क्युलरचा अखिल चित्रेंचा दावा. DHFL कर्जप्रकरण, 38 गुन्हे आणि पासपोर्टवरून चित्रेंनी सवाल उपस्थित केले.

Oct 03, 2026