सुखबीरसिंह बादल

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांच्यावर नांदेडात हल्ला

Sukhbir Singh Badal: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंघ बादल हे नांदेड दौर्‍यावर आले असता त्यांच्यावर गुरुवारी दुपारी १.५० च्या सुमारास खंजरने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांच्यावर नांदेडात हल्ला

Sukhbir Singh Badal

नांदेड (Sukhbir Singh Badal) : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंघ बादल हे नांदेड दौर्‍यावर आले असता त्यांच्यावर गुरुवारी दुपारी १.५० च्या सुमारास खंजरने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर नांदेड येथील यशोसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल (Sukhbir Singh Badal) हे नांदेड जिल्हा दौर्‍यावर आले आहेत. गुरुवारी दुपारी ते गुरुद्वारा मातासाहेब देवाजी मुगट ता. मुदखेड येथील दर्शन घेऊन पायर्‍याने खाली येत असताना त्यांच्यावर एका शिख सेवादाराने त्याच्या हातातील खंजर मारून त्यांना जखमी केले आहे. 

दरम्यान बादल (Sukhbir Singh Badal) त्यांच्या सोबत सुरक्षेसाठी असलेले एसपीयुचे पोलिस निरीक्षक संतोष केंद्रे हे त्यांच्या बचावासाठी धावुन गेले असता त्यांच्या हाताला सुद्धा जखम झाली आहे. त्यांच्यावर यशोसाई रुग्णालय येथे उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती चांगली आहे. हल्ला करणार्‍या सेवादारास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. 

नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,  पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलिस अधिक्षक डॉ .निलाभ रोहण यांनी रुग्णालयास भेट देऊन बादल यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. यावेळी रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.

Sep 29, 2026

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून सीए तणावात; आत्महत्येपूर्वी WhatsApp मेसेज

मुंबईत ३९ वर्षीय सीएने ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीच्या WhatsApp मेसेजच्या आधारे पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल.

Sep 24, 2026
केतन अग्रवाल प्रकरण: सियाने ChatGPT वर काय शोधलं? दोषारोपपत्रातून माहिती समोर

केतन अग्रवाल प्रकरण: सियाने ChatGPT वर काय शोधलं? दोषारोपपत्रातून माहिती समोर

लोहगडच्या दरीत नेऊन केतनचा मृत्यू; आरोपींनी घटनास्थळासह लोणावळ्यातील दरीतील मृत्यूंची माहिती शोधल्याचा पोलिसांचा दावा

Sep 23, 2026