राहुल गांधी

राज्यातील नवनियुक्त काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांशी राहुल गांधी यांचा संवाद

Rahul Gandhi: समारोपप्रसंगी लोकसभेतील विरोधी पक्षनेते, खासदार मा. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उपस्थित राहून राज्यातील नवनियुक्त जिल्हाध्यक्ष तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी आपुलकीने संवाद साधला.

राज्यातील नवनियुक्त काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांशी राहुल गांधी यांचा संवाद

Rahul Gandhi

 

हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाचपुते यांच्या कुटुंबीयांनी घेतली भेट

हिंगोली (Rahul Gandhi) : नाशिक येथे संघटन सृजन अभियानांतर्गत नवनियुक्त काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिर पार पडले. २ सप्टेंबर रोजी झालेल्या शिबिराच्या समारोपप्रसंगी लोकसभेतील विरोधी पक्षनेते, खासदार मा. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उपस्थित राहून राज्यातील नवनियुक्त जिल्हाध्यक्ष तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी आपुलकीने संवाद साधला.

यावेळी हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाचपुते यांच्या कुटुंबीयांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुलजींनी प्रत्येक जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या आपुलकीच्या भेटीमुळे शिबिरातील सर्व जिल्हाध्यक्षांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर राहुल गांधी यांनी नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना तब्बल दोन तास जागतिक राजकारण, भारताची सद्यस्थिती आणि काँग्रेसचे संघटन मजबूत करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ. सतीश पाचपुते म्हणाले, “मा. राहुल गांधीजींच्या मार्गदर्शनातून संघटन मजबूत करण्यासाठी नवी ऊर्जा आणि दिशा मिळाली आहे. राहुलजींच्या विचारांना आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाला अनुसरून हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत व सक्षम करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.”

राहुलजी गांधी (Rahul Gandhi) यांनी जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांशी साधलेला संवाद हा अत्यंत आत्मीय आणि प्रेरणादायी होता. या भेटीमुळे सर्व जिल्हाध्यक्षांचा आत्मविश्वास निश्चितच वाढला आहे, असेही डॉ. सतीश पाचपुते यांनी सांगितले.

टैग्स: Rahul Gandhi

संबंधित सामग्री

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
राहुल गांधींकडून ‘सत्याग्रह’ पोर्टल लाँच; देशभरातील जनतेच्या तक्रारी आणि आंदोलनांची माहिती आता एकाच नकाशावर

राहुल गांधींकडून ‘सत्याग्रह’ पोर्टल लाँच; देशभरातील जनतेच्या तक्रारी आणि आंदोलनांची माहिती आता एकाच नकाशावर

राहुल गांधी यांनी ‘सत्याग्रह’ पोर्टल लाँच केले. नागरिकांना तक्रारी व आंदोलनांची माहिती नोंदवता येणार असून, विविध संघर्ष डिजिटल नकाशावर जोडले जाणार आहेत.

Oct 03, 2026
मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

राज-उद्धव ठाकरेंच्या मुंबई मोर्चाची तयारी, विरोधी पक्षांचा पाठिंबा आणि पूर्णेकर हत्या प्रकरणावर संजय राऊतांच्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण.

Oct 03, 2026
‘वोट चोरी, सरकार चोरी, आता पार्टी चोरी!’; राहुल गांधींचा हल्लाबोल

‘वोट चोरी, सरकार चोरी, आता पार्टी चोरी!’; राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi: काँग्रेसवरील कारवाईचा संदर्भ देत यापूर्वीच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षचिन्हाच्या वादांचाही उल्लेख केला. तसेच, भाजप आणि निवडणूक आयोग संगनमत करून विरोधी पक्षांमध्ये फूट

Sep 18, 2026