साखर साठेबंदी

मोठ्या साखर खरेदीदारांवर सरकारचा फास; १५ दिवसांवर साठेबंदीची कुऱ्हाड

Sugar Hoarding Crisis: सणासुदीच्या काळात साखरेची वाढती मागणी आणि संभाव्य साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या साखर खरेदीदारांवर कडक निर्बंध लागू केले आहेत.

मोठ्या साखर खरेदीदारांवर सरकारचा फास; १५ दिवसांवर साठेबंदीची कुऱ्हाड

Sugar Hoarding Crisis

साखर साठ्यावर थेट नजर

नवी दिल्ली (Sugar Hoarding Crisis) : सणासुदीच्या काळात साखरेची वाढती मागणी आणि संभाव्य साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या साखर खरेदीदारांवर कडक निर्बंध लागू केले आहेत. 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत दरमहा 10 मेट्रिक टन म्हणजेच 100 क्विंटलपेक्षा अधिक साखर वापरणाऱ्या व्यापारी, व्यावसायिक आणि संस्थांना आता त्यांच्या १५ दिवसांच्या गरजेपेक्षा अधिक साठा करता येणार नाही

मिठाई, बेकरी, बिस्किट, कन्फेक्शनरी, शीतपेय आणि खाद्यप्रक्रिया उद्योगातील मोठ्या ग्राहकांना या नियमाचा फटका बसणार आहे. यापूर्वी अशा ग्राहकांना 30 दिवसांच्या गरजेइतका साठा ठेवण्याची मुभा होती. मात्र, (Sugar Hoarding Crisis) साखरेच्या वाढत्या किमती आणि गणेश चतुर्थी, दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही मर्यादा थेट निम्म्यावर आणण्यात आली आहे.

साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकार खरेदी-वापराच्या आकडेवारीची छाननी करणार आहे. (Sugar Hoarding Crisis) साखर कारखान्यांकडून झालेली विक्री आणि संबंधित व्यावसायिकांच्या वस्तू व सेवा कर विवरणपत्रातील माहितीचा मेळ घातला जाणार आहे. साखरेचा संबंधित एचएसएन क्रमांक, खरेदी, प्रत्यक्ष वापर आणि शिल्लक साठा तपासला जाणार आहे.

गरजेइतकाच साठा ठेवता येईल!

1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2026  या काळात दरमहा १० मेट्रिक टनांपेक्षा अधिक (Sugar Hoarding Crisis) साखर वापरणाऱ्या ग्राहकांना केवळ १५ दिवसांच्या गरजेइतकाच साठा ठेवता येईल. यापूर्वी ही मर्यादा ३० दिवसांची होती. त्यामुळे सणासुदीपूर्वी मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करून साठवणूक करणाऱ्या व्यावसायिकांवर सरकारची थेट नजर राहणार आहे.

संबंधित सामग्री

साखरेच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता; शंभरीपार जाण्याची भीती

साखरेच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता; शंभरीपार जाण्याची भीती

ऊस उत्पादन घटल्याने, कमी स्टॉक आणि इथेनॉल निर्मितीमुळे साखरेचे दर शंभरीपार जाण्याची शक्यता; दिवाळीच्या फराळावर महागाईची झळ बसू शकते.

Oct 01, 2026
दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ

दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ

Consumers Hit by Inflation: विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी डाळी, तेल, तूप आणि अन्य किराणा वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. बाजारात कडधान्यांच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खर्चात भर

Sep 30, 2026
दिवाळीच्या फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही, पण 24 तासांची मुभाही नाही; सुप्रीम कोर्टाचा संतुलित पर्यायाचा संकेत

दिवाळीच्या फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही, पण 24 तासांची मुभाही नाही; सुप्रीम कोर्टाचा संतुलित पर्यायाचा संकेत

दिवाळीच्या फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही, पण 24 तास वापराची मुभाही नाही. सुप्रीम कोर्टाने ठरावीक वेळेचा पर्याय सुचवत CPCB ला 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली.

Sep 30, 2026
महाप्रसाद, भंडाऱ्यासाठी आता FDAची परवानगी आवश्यक; तुकाराम मुंढेंचा नवा ॲक्शन प्लॅन

महाप्रसाद, भंडाऱ्यासाठी आता FDAची परवानगी आवश्यक; तुकाराम मुंढेंचा नवा ॲक्शन प्लॅन

सण-उत्सवांच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, तसेच अन्नभेसळीला आळा घालता यावा यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने वर्षभरासाठी विशेष नियोजन केले आहे.

Sep 03, 2026
केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा DA वाढीची प्रतीक्षा; दिवाळीआधी ३ ते ४ टक्के महागाई भत्ता वाढण्याची शक्यता

केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा DA वाढीची प्रतीक्षा; दिवाळीआधी ३ ते ४ टक्के महागाई भत्ता वाढण्याची शक्यता

केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) वाढीबाबत पुन्हा एकदा सकारात्मक संकेत मिळत आहेत.

Aug 03, 2026