महावितरणच्या परभणीतील अधिकार्यावर कारवाई कर्तव्यात हलगर्जीपणा!
परभणी (Mahavitaran) : ब्रेक डाऊन झाल्याने वीज पुरवठा खंडीत (Power Outage) होऊन गावे अंधारात गेली. याबाबत वरिष्ठांनी सहाय्यक अभियंत्याला भ्रमनध्वनीव्दारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधीताने मोबाईल फोन उचलला नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. ब्रेक डाऊनमुळे (Break Down) वीज ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागला. कामात हलगर्जी केल्याने महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास सेवेतुन निलंबीत करण्यात आले आहे. याबाबत 31 जुलै रोजी अधिक्षक अभियंता रुपेश टेंभुर्णे यांच्या स्वाक्षरीने आदेश काढण्यात आले आहेत.
ब्रेक डाऊनमुळे वीज ग्राहकांना खंडीत वीज पुरवठ्याने नाहक त्रास!
राहुल पांडूरंगराव घोडके (Assistant Engineer, Mahavitaran) असे निलंबीत करण्यात आलेल्या अधिकार्याचे नाव आहे. संबंधीत अधिकार्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावामध्ये ब्रेक डाऊनमुळे 33 के.व्ही. उपकेंद्र राहटी येथील फिडरवर बारा तास वीज गुल झाली. या फिडरवरील गावे अंधारात गेली. सदर उपकेंद्र राहुल घोडके यांच्या कार्यक्षेत्राअंतर्गत येत असल्यामुळे याबाबत वरिष्ठांनी भ्रमनध्वनीव्दारे (Hallucinations) त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी मोबाईल उचलला नाही. त्यानंतरही कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. ब्रेक डाऊनमुळे वीज ग्राहकांना खंडीत वीज पुरवठ्याने नाहक त्रास सहन करावा लागला. या प्रकाराने कंपनीची जनमाणसात प्रतिमा मलीन झाली. कर्तव्यात कसुर केल्याने संबंधीत अधिकार्याला कंपनीच्या सेवेतुन निलंबीत करण्यात आले आहे. निलंबना दरम्यान, उपकार्यकारी अभियंता उपविभाग कार्यालय सेलू या कार्यालयात उपस्थित राहुन हजेरी नोंदवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.