अपर्णा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ही परंपरा आजतागयत कायम!
रिसोड (Mangalagaur) : येथील अपर्णा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मंगळवार १९ ऑगस्ट रोजी मंगळागौर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शहरातील हिंगोली रोडवरील बीटीएम हॉटेलच्या हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. पुरोगामी विचारधारा पुढे घेऊन जाण्याचा संकल्प करीत हल्ली दैनंदिन धकाधकीच्या जीवनात मंगळागौर पूजन हळूहळू कालबाह्य होत चाललंय. परंतु अपर्णा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या (Aparna Mahila Multipurpose Charitable Organization) माध्यमातून ही परंपरा आजतागयत कायम आहे. मंगळागौर हा एक महाराष्ट्रीयन सण आहे. जो श्रावण महिन्यात (हिंदू कॅलेंडरनुसार) नवविवाहित महिलांसाठी महत्वाचा असतो. या व्रतात, महिला एकत्र येऊन देवी पार्वतीची (मंगळागौर) पूजा करतात आणि रात्री जागरण करून विविध खेळ खेळतात.
मंगळागौर म्हणजे काय?
देवी पार्वतीची पूजा-
मंगळागौर म्हणजे देवी पार्वती (गौरी) हिची पूजा. ही पूजा नवविवाहित महिलांसाठी विशेष असते, जी लग्नानंतर पहिली पाच वर्षे श्रावण महिन्यात प्रत्येक मंगळवारी केली जाते.
पतीच्या दीर्घायुष्यासाठी-
या व्रतामागे पतीच्या दीर्घायुष्याची आणि सुखी वैवाहिक जीवनाची कामना असते. सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व:
मंगळागौर हा सण केवळ धार्मिक नाही, तर महिलांसाठी सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही महत्त्वाचा आहे. यात स्त्रिया एकत्र येतात, गाणी गातात, खेळ खेळतात आणि आनंद साजरा करतात.
श्रावण महिन्यातील उत्सव-
श्रावण महिना हा हिंदू धर्मात पवित्र मानला जातो. या महिन्यात अनेक व्रतवैकल्ये केली जातात, आणि मंगळागौर हा त्यापैकीच एक महत्वाचा उत्सव आहे. सहभागी महिलांनी आपली पारंपारिक संस्कृती जपवणूक करून वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून मंगळागौर सादर केला. त्याचबरोबर मजेशीर उखाणे घेऊन हास्यकल्लोळ करीत कार्यक्रम पार पडला.पारंपारिक खेळांबरोबर महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.मंगळागौर कार्यक्रमात उत्कृष्ट नृत्य, गायन, कला सादर करणाऱ्या महिलांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित कऱण्यात आले. या मध्ये प्रथम क्रमांक मोनिका वाघमारे, द्वितीय चिनू शिंदे, तर तृतीय कल्याणी बोबडे यांना देण्यात आला.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित!
कोणत्याही संघटनेत महिलांची शक्ती महत्त्वाची असते. अपर्णा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ही परंपरा कायम टिकून राहण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहुया असे आवाहन उपस्थीत महिलांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अपर्णा महिला बहुउद्देशीय सेवा संस्थेचा अध्यक्ष अपर्णा विजय जायभाये, कल्याणी नितीन मोरे यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.