देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा थेट इशारा; 288 जागा लढविणार किंवा पाडणार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा थेट इशारा; 288 जागा लढविणार किंवा पाडणार
मराठवाडामहाराष्ट्रराजकारणहिंगोली

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा थेट इशारा; 288 जागा लढविणार किंवा पाडणार

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/07 at 2:35 PM
By Deshonnati Digital Published July 7, 2024
Share
Manoj Jarange Patil

हिंगोलीत पहिल्या संवाद रॅलीत मनोज जरांगेंचा थेट इशारा

हिंगोली (Manoj Jarange Patil)  : १३ जुलैपर्यंत राज्यातील सरसकट मराठ्यांना कुणबी म्हणून (Maratha Reservation) मराठा आरक्षण दिले नाही तर राज्यात २८८ जागा लढविणार किंवा २८८ उमेदवार पाडणार असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी हिंगोलीत दिला. मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या संवाद रॅलीच्या हिंगोली जिल्ह्यातील जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील बोलत होते. राज्यातील सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, सग्या सोयर्‍यांची अंमलबजावणी सरकारनेच करावी आणि सरकारनेच टिकवावी, आम्हाला राजकारण करायचे नाही; पण आमची मागणी मान्य झाली नाही तर राज्यात २८८ जागेवर उमेदवार उभे करायचे किंवा २८८ उमेदवार पाडायचे, हे सामुहिकरित्या ठरविले जाणार असल्याचे जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जाहीर केले.

सारांश
हिंगोलीत पहिल्या संवाद रॅलीत मनोज जरांगेंचा थेट इशारामराठा आरक्षणाची मागणी तांत्रिकदृष्ट्या योग्यच

मराठा समाज एकत्रित आल्यामुळे अनेकांच्या पोटात दुखत आहे. सर्व राजकीय पक्षाचे नेते एकत्रित आले आहेत. मराठ्यांना चारही बाजूने घेरले जात आहे. यापुढे मला बदनाम करण्याचे प्रयत्न होतील, मला एकटा पाडण्याचा प्रयत्न होईल, फक्त (Maratha Reservation) मराठा समाजाने आपले पाठबळ माझ्या मागे असू द्यावे एवढीच विनंती करायला मी आलो आहे, असे म्हणून जरांगे पाटील म्हणाले. महाराष्ट्र ही छगन भुजबळांची मक्तेदारी नाही. मराठ्यांना आडवे जाल तर मराठे आडवा पाडतील, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. मराठ्यांनी गोरगरीब ओबीसींवर चालून जाऊ नये तसेच ओबीसींनीही मराठ्यांच्या अंगावर जाऊ नये, आरक्षण मराठ्यांसहीत मुस्लिम व ब्राम्हणांनाही मिळाले पाहिजे, अशी मागणीही (Manoj Jarange Patil) जरांगे पाटील यांनी केली. हिंगोलीतील आयोजना बाबत कौतुक करताना जरांगे पाटील यांनी हिंगोलीकरांचे धन्यवाद व्यक्त केले.

मराठा आरक्षणाची मागणी तांत्रिकदृष्ट्या योग्यच

१९६७ ला देशभरातील १८० जाती ओबीसीमध्ये घालण्यात आल्या. त्यात ८३ क्रमांकावर कुणबी घातला गेला. आज १८० च्या साडेतिनशे ते चारशे जाती ओबीसी गटात झाल्या. त्यावेळी या गटात घातलेल्या १८० जातीच्या सर्व पोटजाती पुढे सामावून घेण्यात आल्या; परंतु ८३ क्रमांकावर घातल्या गेलेल्या कुणबी जातीची एकही पोटजात वाढविण्यात आली नाही. जशा १८० च्या चारशे झाल्या तशा एक कुणबीच्या दोन-चार का वाढवू शकत नाही, असा सवाल उपस्थित करत जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी तांत्रिकदृष्ट्या (Maratha Reservation) मराठा समाजाची मागणी कशी योग्य आहे हे सांगितले.

You Might Also Like

National Highway: राष्ट्रीय महामार्गाच्या एअर ब्रिजवर नेत्यांच्या जाहिराती!

CM Aid Fund: मुख्यमंत्री सहायता निधीसाठी लातूरमधून दिले 21 धनादेश!

Adani AI Data Centre: भारतात बनणार सर्वात मोठे AI हब; अदानी आणि गुगलचे सामायिक दृष्टिकोन

Crop Harvesting Experiment: परभणीत पीक कापणी प्रयोग; विमा कंपनीकडून शेतकर्‍यांची फसवणुक!

Parbhani Accident: परभणीतील पाथरी रोडवर अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी!

TAGGED: Hingoli rally, Manoj Jarange, Manoj Jarange Patil, Maratha Rally, Maratha Reservation
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडापरभणीशेती

Parbhani: वंदनीय बाळासाहेब ठाकरे वृक्ष लागवड व संवर्धन अभियान सुरू; १ लक्ष वृक्ष वाटप

Deshonnati Digital Deshonnati Digital August 1, 2024
Corona Vaccine: धक्कादायक: कोरोना लस आणि अचानक होणाऱ्या मृत्यूंमध्ये थेट संबंध?
Nagpur Municipal school: मोठा निर्णय…महापालिकेच्या इंग्रजी माध्यम शाळांची संख्या वाढविणार
Meerut Suicide Case: घरी मुलीची हळद अन्…घडली हि दुर्दैवी घटना
Regional Transport Department: राख वाहून नेणाऱ्या 11 वाहनांना ठोठावला तब्बल 6 लाखांचा दंड
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

National Highway
लातूरमराठवाडा

National Highway: राष्ट्रीय महामार्गाच्या एअर ब्रिजवर नेत्यांच्या जाहिराती!

October 14, 2025
CM Aid Fund
लातूरमराठवाडा

CM Aid Fund: मुख्यमंत्री सहायता निधीसाठी लातूरमधून दिले 21 धनादेश!

October 14, 2025
Adani AI Data Centre
Breaking Newsतंत्रज्ञानदेशमहाराष्ट्रविदेश

Adani AI Data Centre: भारतात बनणार सर्वात मोठे AI हब; अदानी आणि गुगलचे सामायिक दृष्टिकोन

October 14, 2025
Crop Harvesting Experiment
परभणीमराठवाडा

Crop Harvesting Experiment: परभणीत पीक कापणी प्रयोग; विमा कंपनीकडून शेतकर्‍यांची फसवणुक!

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?