मानोरा (Washim) :- राज्यात बहुचर्चित असलेल्या यवतमाळ (Yawatmal) जिल्ह्यातील दिग़स येथील जनसंघर्ष अर्बन निधीतील ४९ कोटींच्या अपहाराचा मास्टरमाइंड प्रणीत मोरे हा तब्बल १५ कोटी रुपये घेऊन पसार झाला होता. त्याच्या अटकेला मोठा कालावधी होऊनही ९ कोटींचा हिशेब लागला नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ठेवीदारांना त्यांच्या कष्टाचे पैसे परत मिळणार तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पेट्रोलपंप, जागा विक्री व्यवहार रेकॉर्डवर तर अनेकांना नोटीस बजावल्याने भरली धडकी !
जनसंघर्ष अर्बन निधीच्या दिग्रस, पुसद, आर्णी, दारव्हा, नेर, मानोरा आणि कारंजा येथे शाखा सुरू करून प्रणीत मोरे यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने सहा हजार २०० खातेदारांच्या रकमेवर डल्ला मारला. या प्रकरणाला तीन महिन्यांच्या वर कालावधी लोटला आहे; परंतु अजूनपर्यंत खातेदारांना त्यांचे पैसे परत मिळाले नाही. दिग्रसमधून पसार होण्यापूर्वी प्रणीतने अनेक मालमत्तांची विक्री केली. त्यात दिग्रस येथील पेट्रोलपंप आणि जागा, फार्महाउस, प्लॉट, दुकान गाळे यासारख्या मालमत्तेचा समावेश आहे. यातून जवळपास त्याने १५ कोटी रुपये गोळा करून पलायन केले होते. लोणावळ्यातून त्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्याकडे कुठलीही रोकड सापडली नाही. आजवरच्या तपासात प्रणीतने केलेल्या व्यवहारातील केवळ तीन कोटी रुपये वसूल करण्यात प्रशासनाला यश आले. पेट्रोलपंप (Petrol Pump) आणि जागा खरेदी-विक्री व्यवहार रेकॉर्डवर आल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. या प्रकरणात न्यायालयातही (court of law) अर्ज दाखल करण्यात आला होता.
९ एप्रिलला तिघांच्या तर १० एप्रिलला एकाच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार
या व्यवहारातील अंदाजे दोन ते अडीच कोटी प्रणीतने आधीच घेतले होते. एक कोटी ४० लाख रुपये प्रणीतला संबंधितांकडून घेणे बाकी असल्याचे समोर आल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्यानंतर करारनाम्यानुसार पेट्रोल पंप आणि जागा हस्तांतरणासाठी प्रणीतची स्वाक्षरी आवश्यक असल्याने कारागृह आणि संबंधित कंपनीला न्यायालयाने प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहे. शिवाय सदर एक कोटी ४० लाख रुपये न्यायालयात भरून खातेदारांना परत करण्याचे आदेश दिले आहेत.