गैरप्रकार रोखण्यासाठी परिसरातील दुकाने केली बंद
मानोरा (Manora Police) : तालुक्यातील विठोली येथे सुरु असलेल्या १२ वीच्या रसायनशास्त्र या विषयाचा २० फेब्रुवारी सुरु असलेल्या पेपरला (Manora Police) मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण शिंदे यांनी तगडा पोलीस बंदोबस्त लावल्याने कॉपी बहाद्दर विद्यार्थीचे चांगलेच धाबे दनाणले आहे.
मानोरा तालुक्यात परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपी चालत असल्याने वाशीम जिल्ह्यातील इतर तालुक्यातून व बाहेर जिल्ह्यातील विद्यार्थी ग्रामीण भागात असलेल्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी मोठी रक्कम मोजून प्रवेश घेतात. कॉपीच्या जोरावर चांगले मार्क घेऊन पास होतात. यावर्षी सुद्धा तालुक्यातील विठोली येथील १२ वीच्या परीक्षेत ४५० विद्यार्थी परीक्षा देत असून विठोली केंद्र हे अति सवेंदनशील मध्ये मोडत असल्याने यावेळी (Manora Police) मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण शिंदे यांनी २० फेब्रुवारीला ११ ते २ वाजता विठोली केंद्रावर रसायनशास्त्र पेपर असल्याने पूर्ण केंद्राभोवती २० पोलीस कर्मचारी यांचा तगडा बंदोबस्त लावल्याने कोणत्याच पाल्यास केंद्राच्या आत जाऊन कॉपी देता आली नाही.
केंद्राजवळ रस्त्यालगत असलेली दुकाने बंद ठेवल्याने कॉपी करणाऱ्या विद्यार्थी यांना रसायनशात्र पेपरला बाहेरून कॉपी मिळाली नसल्याने आज त्याची मोठी हिरमोड झाली. तर डोनेशन घेऊन विध्यार्थी यांना प्रवेश देणाऱ्या शाळा चालकाचा यामुळे चांगलाच हिरमोड झाल्यामुळे दर वेळी आपली शाळेचा निकाल शंभर टक्के न लागता यावेळी कमी लागण्याची दाट शक्यता असून असाच बंदोबस्त इतर असंवेदनशील केंद्र व इतर केंद्रावर लावल्यास भविष्यात विद्यार्थी कॉपीवर अवलंबून न राहता अभ्यास करतील असा सूर सुज्ञ नागरिकातून व्यक्त होत आहे. (Manora Police) केंद्राच्या आत कोणालाच प्रवेश दिला नसल्याने कॉपीमुक्त वातावरणात पेपर शांततेत पार पडला.