मानोरा (Manora Police) : मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे दापुरा येथे दि. १५ सोटेंबर रोजी (Manora Police) पोलीसानी गुप्त माहितीवरून गावठी हात भट्टी दारूवर धाड टाकून दोन आरोपींचा ५९ हजाराचा मोहमाच आणि गावठी दारु नष्ट केली. याप्रकरणी आरोपी महादेव झापा राठोड व तुळशीराम रामजी राठोड यांचेवर कलम ६५ ई एफ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये पोलीसांनी गुन्हा दाखल केला.
पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार मौजे दापुरा महादेव राठोड यांच्या घरातून २१० लिटर सडवा मोहामाच टाकी सह २३ हजार रुपये किमतीची व ५ लिटर गावठी दारू असा एकुण २३ हजार ५०० आणि आरोपी तुळशीराम राठोड यांचे घरातून २४० लिटर सडवा मोहामाच टाकी सह २७ हजार रूपये किमतीचे व ५० लिटर गावठी दारु ५०० रूपये असा एकूण ३२ हजार रुपयाचा प्रो माल पकडण्यात आला. तुळशीराम राठोड येथे गावठी हात भट्टीची दारु मोहन चव्हाण विक्री करत असल्याची गुप्त माहिती (Manora Police) पोलिसांना मिळाली. यावरून पोलीसांनी धाडसत्र राबवून कारवाई केली. या कारवाईत सहायक फौजदार महाजन, पो हे का पुनेवार स. फौजदार रविंद्र राजगुरे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.