मानोरा (Manora Police) : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावातील अल्पवयीन मुलगी शिवण क्लास करिता घरून गेली ती पुन्हा घरी परत गेली नसल्याने पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिल्याने (Manora Police) पोलिसांनी पथक तयार करून शोध कामी गेले असता मुलगी दारव्हा येथे मिळून आली. आरोपी अद्याप फरार आहे.
पोलीस सूत्राकडून प्राप्त माहिती नुसार तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी हिने शिवण क्लास ला प्रवेश घेतला होता. १५ सप्टेंबर ला मिटिंग आहे असे म्हणून ती घरून गेली मात्र ती परत आली नसल्यामुळे पीडित मुलीच्या वडिलांनी मानोरा पोलीस स्टेशनला १६ सप्टेंबर ला फिर्याद दिल्याने अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करून पोलिसांनी पथक तयार करून पनवेल येथे पाठविले तेथे माहिती घेतली असता तेथून ते गेल्याचे कळाले त्यांचा शोध घेत पोलीस दारव्हा येथे आले असता २५ सप्टेंबर ला (Manora Police) मानोरा पोलीस स्टेशनला येऊन पीडित मुलीने आपली आपबिती कथन केली.
मुलीची बयान व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या अहवाल वरून आरोपी मनिष उकंडा राठोड यांचे विरुद्ध कलम १३७ (२), ६४(२), (आय ), (एम ), ६९ बी एन एस. सह कलम ४, ८, १२ बाल लैंगिक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी मुलीस नातेवाईक यांचे ताब्यात दिले. आरोपी अद्याप फरार असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रवीण शिंदे यांचे मार्गदर्शना खाली (Manora Police) पोलीस उपनिरीक्षक विजय अजमिरे हे करीत आहे.