उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अनेक मान्यवरांचा प्रवेश
परभणी (Ajit Pawar Group) : पालम व गंगाखेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाला चांगलाच धक्का बसला आहे. दोन्ही तालुक्यातील जवळपास २६ मान्यवरांनी बुधवार २६ मार्च रोजी आ. राजेश विटेकर यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Group) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
या पक्ष प्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (Sharad Pawar) शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष तथा गंगाखेड मार्केट कमिटीचे संचालक उध्दवराव सातपुते, पालम नगर पंचायतचे नगराध्यक्ष वसंतराव सिरस्कर, बंटी राठोड, दिगंबरराव घोगरे, विठ्ठलराव फडके, बाबुराव चव्हाण, माणिकराव बडवणे, अनिल पवार, माजी पं.स. सदस्य दत्तराव भोसले, भास्करराव सिरस्कर, प्रभाकर सिरस्कर, गजानन पवार, सुगंध हिरवे, वैâलास रुद्रवार, देवानंद लांबतुरे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ हत्तीअंबीरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बळीराम चौरे, अनंतराव खंडाळकर, नरहरी भोसले यांच्यासइ इतर मान्यवरांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Group) यांनी स्थानिक स्वराज्य संस्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य कसे वाढेल यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन केले.
जनतेसाठी सदैव तत्पर
विकासकामा संदर्भात तसेच सर्वसामान्यांच्या कामा संदर्भात तुम्ही मला केव्हाही हाक द्या मी तुमच्यासह जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर असेल.
– आ. राजेश विटेकर