Yawatmal poisoning :- येथे दोन दिवसांपूर्वी एका धार्मिक कार्यक्रमाच्या जवळपास पन्नास जणांना अन्नातुन विषबाधा (poisoning) होऊन यांचेवर शेंबाळपिंपरी आणि पुसद येथे उपचार सुरू असुन सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
पुसद मध्ये उपचार प्रकृती स्थिर
याबाबत शेंबाळपिंपरी येथे दोन दिवसांपूर्वी एक धार्मिक कार्यक्रम पार पडला यावेळी देण्यात आलेल्या अन्नातुन जवळपास पन्नास जणांना उलटी, संडास, पोटदुखी चा त्रास होवु लागल्याने त्यांना येथील डॉ. अजित चंदेल यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक होवु लागल्याने तेरा जणांना पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जणांवर चंदेल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींना सुट्टी देण्यात आली. याबाबत डॉ. चंदेल यांचेकडे चौकशी केली असता अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगण्यात आले असुन विषबाधा झालेल्या सर्वाची प्रकृती स्थिर असल्याचे ही सांगितले. तर याबाबीला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नामदेव सरकुंडे यांनी ही दुजोरा दिला. विषबाधा झालेल्याचा वयोगट पाच ते पंचवीस वर्षे असल्याने ही सांगण्यात आले.