ओला दुष्काळ जाहीर करून बाधीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा!
मानोरा (Market Committee) : मानोरा तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून सततचा संततधार पाऊस व ढगफुटी सदृश आलेल्या सुलतानी व अस्मानी संकटामुळे पिके पाण्याखाली आली असुन, नदी नाल्या काठची शेतजमीन खरडून जात प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने (Government) संपूर्ण तालुका ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पिक कर्ज माफ करावे, असा ठराव बाजार समितीचे सभापती डॉ संजय रोठे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच रोजी एकमताने कृषी उत्पन्न बाजार समितीने वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला आहे.
बाजार समितीचा ठराव एकमताने सर्वानुमते मंजूर!
आकांक्षीत वाशिम जिल्ह्यातील अति मागासलेला तालुका म्हणून मानोरा तालुका ओळखला जातो. या तालुक्यात ९० टक्के लोकांचा संसार शेतीवर अवलंबून आहे. बहुतांश शेतकरी नगदी सोयाबीन घेतात. यावर्षी खरीप हंगामातील सर्व पाण्याखाली सापडले आहेत. अतिवृष्टीच्या महापुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सिंचन विहीर खचून बुजल्याअसुन अनेकांच्या घराची पडझड झाली आहे. अतिवृष्टी व संततधार मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलामुलींचे लग्न, शिक्षण शेतीसाठी घेतलेले कर्ज , उधार उसने कर्ज कसे फेडायचे याची काळजी शेतकऱ्यांना पडली आहे. त्यामुळे शासनाने तालुक्यात ओला दुष्काळ करून शेतकऱ्यांना (Farmers) सरसकट मदत करावी व कर्जमाफीचा लाभ द्यावा असे एकमताने सर्वानुमते ठराव पारीत करून मंजुर करण्यात आला. व तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महामहीम राज्यपाल, कृषिमंत्री याजकडे पाठविण्याचे ठरविण्यात आले. ठरावावर सूचक सचिन रोकडे अनुमोदक सिमाबाई संजय पवार यांच्या सहया असुन सर्वसाधारण सभेला सभापती डॉ. संजय रोठे उपसभापती भुजंगराव राठोड, संचालक अरविंद राऊत, विलास पाटील, श्रीमती पुष्पाताई यशवंतराव इंगळे, अभिजीत पाटील, माणीक पवार, आशिष पाटील, दिनेश राठोड, सुनिता मानकर, सुनिल जामदार, विजय राठी, अरूणा हेडा, निलेश ठाकरे, इंदुताई इंगोले, अनीस शेख नजीम शेख, सेवा सहकारी संस्था प्रतिनिधी, ग्राम पंचायत प्रतिनिधी, अडते व्यापारी प्रतिनिधी, हमाल मापारी प्रतिनिधी यांच्या ठरवावर स्वाक्षऱ्या आहेत. या सर्वसाधारण सभेला प्रगतशील शेतकरी अभयखेडा सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सुधाकर चौधरी, माजी सरपंच महेश पाटील, सामाजिक कार्यकर्ता रोशन चव्हाण, वंचितचे नेते दिपक खडसे, यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.