Hotel Paradise Chandrapur :- शहराचा तुकूम परिसरातील पॅराडाईस रेस्टॉरंटला भीषण आग (Fire) लागली. ही आग आज दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारे लागली असल्याची माहिती आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. आग लागताच परिसरातील नागरिकात एकाच खळबळ उडाली. आग लागण्याची माहिती महानगरपालिकेला देण्यात आली. आग आटोक्यात आणण्याकरीता अग्निशमन दल (fire team) दाखल झाली. सध्या आग आटोक्यात आली. सदर घटनेत हॉटेलचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहे.