जिल्ह्यातून समाजबांधव मोर्चात सहभागी होणार!
रिसोड (Jan Aakrosh Morcha) : अनुसूचित जातींसाठी असलेल्या 13 टक्के आरक्षणात अ, ब, क, ड उपवर्गीकरण करावे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची (Supreme Court Order) अंमलबजावणी तत्काळ करावी, या व इतर प्रमुख मागण्यांसाठी 20 मे रोजी मुंबईतील आझाद मैदानावर जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात समाजबांधवांनी मोठया संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मातंग समाजाचे (Matang Society) महाराष्ट्र राज्याचे समन्वयक विनोद जोगदंड यांनी केले आहे.
अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाची मागणी!
या मोर्चात वाशिम जिल्हयासह राज्यभरातून मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. याअनुषंगाने मोर्चामध्ये सहभागी होण्यासंदर्भात मोठया प्रमाणात आढावा बैठका सुद्धा घेतल्या जात आहेत.अशी माहिती जोगदंड यांनी दिली आहे. गत अनेक वर्षांपासून अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाची मागणी (Scheduled Caste Subclassification Demand) केली जात आहे.या मागणीसाठी जिल्ह्यातील मातंग समाज बांधवांच्या वतीने वेळोवेळी आंदोलन, मोर्चे केली असून मुंबईत होणाऱ्या जनआक्रोश मोर्चात देखील अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, त्याअनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे. असेही त्यांनी सांगितले.




