परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे प्रतिपादन भाजपा परभणी महानगरतर्फे दिवाळी स्नेह-संवाद मेळावा!
परभणी (Meghna Bordikar) : भाजपा हा कार्यकर्त्यांच्या (Activists) कष्टांवर उभा असलेला पक्ष आहे. आगामी परभणी महानगरपालिका निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने एकसंघ राहून पक्षाचे बळ वाढवावे. दिवाळी हा आनंद, ऐक्य आणि नवचैतन्याचा सण आहे — त्याच उत्साहाने आपण जनतेत जावे आणि विकासाचा दीप प्रज्वलित करावा असे प्रतिपादन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले. त्या भाजपा परभणी महानगरच्या वतीने सोमवार २० ऑक्टोबर रोजी कौस्तुभ मंगल कार्यालयात आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता दिवाळी फराळ, स्नेह-संवाद मेळाव्यात बोलत होत्या.
या मेळाव्यास मा.मंत्री सुरेशराव वरपूडकर, जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे, ह.भ.प. माधवराव आजेगावकर, विजयराव वरपुडकर, विलासमामा चांदवडकर, प्रमोद वाकोडकर, डॉ.केदार खटिंग, राजेश देशमुख, संजय शेळके, सुनिल देशमुख, दिलीपराव देशमुख, विलासराव कौसडीकर, प्रशांत सांगळे, मोकिंद खिल्लारे, रितेश जैन, मधुकर गव्हाणे, मोहन कुलकर्णी, संतोष चौधरी, राधाजी शेळके, प्रदीप तांदळे मंगलताई मुदगलकर, मनीषा जाधव यांची व्यासपिठावर उपस्थिती होती.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मन:पूर्वक आभार!
उपस्थित मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, ‘भाजप सरकारने केलेली जनकल्याणकारी कामे प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. संघटनेच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांपर्यंत आपला संवाद अधिक दृढ व्हावा.’ दिवाळीच्या पारंपरिक वातावरणात झालेल्या या स्नेह-संवाद मेळाव्यात भाजप परभणी महानगरातील पदाधिकारी, विविध आघाड्या, प्रकोष्ठ, सेल, मंडळ अध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसेच असंख्य कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. या यशस्वी आयोजनाबद्दल भाजप परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मन:पूर्वक आभार मानले.
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्नेहपूर्वक संवाद साधत आपापसांतील एकात्मता आणि कार्यनिष्ठेचा संदेश दिला!
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भालचंद्र गोरे तर आभार प्रदर्शन शंकर आजेगावकर यांनी केले. कार्यक्रमानंतर पारंपरिक दिवाळी फराळ आयोजित करण्यात आला. उपस्थित मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्नेहपूर्वक संवाद साधत आपापसांतील एकात्मता आणि कार्यनिष्ठेचा संदेश दिला.