तुमसर येथील घटना
तुमसर (Electric Shock Death) : आंघोळीकरीता मोटारपंप सुरू करीत असताना विद्युत करंट लागल्याने निर्माणाधिन बांधकामावरील परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना दि.७ ऑक्टोबर रोजी दुपारी तुमसर येथील गीता स्टीलच्या मागे घडली. साहेब उदय माल (२७) रा.डेबाग्राम (पश्चिम बंगाल) असे मृतकाचे नाव आहे.
पश्चिम बंगाल राज्यातील मृतक हा तुमसर येथील एका नवनिर्माणाधिन बांधकामावर मजुर म्हणून कामावर होता. (Electric Shock Death) घटनेच्या दिवशी दुपारी मृतक हा आंघोळीकरीता मोटारपंप सुरू करण्याकरीता गेला होता. पंप सुरू करीत असताना त्याच्या हाताला विद्युत करंट लागला. त्यात तो जमिनीवर कोसळला.
ही घटना उघडकीस येताच त्याला तत्काळ उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून साहेब माल या परप्रांतीय मजुराला मृत घोषीत केले. माहिती मिळताच (Electric Shock Death) तुमसर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले. याप्रकरणी तुमसर पोलिसात मर्ग दाखल केला आहे.




