रिसोड पोलिसांची विशेष कामगीरी
रिसोड (Minor Girl Kidnapping) : तालुक्यातील कंकरवाडी येथिल आरोपी लक्ष्मण विश्वनाथ जाधव वय 28 वर्षे याने हिंगोली जिल्ह्य़ातील शेनगाव तालुक्यातील एका गावातील आपल्याच नातेवाईकाच्या अल्पवयीन मुलीस फुस लावुन (Minor Girl Kidnapping) पळवुन फरार झाला होता. याची तक्रार पिडीता च्या वडीलांनी 30 मार्च ला रिसोड पोलिसात दाखल करताच ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पिएस.आय.अशोक गिते,पो.काॅ.रामेश्वर काळे यांनी तपासाची सुत्रे जलद गतीने फिरवीत आरोपीला पुणे जिल्ह्य़ातील खेड तालुक्यातील चन्होळी खु.येथुन ताब्यात घेतले आहे.आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आसुन दोन दिवसांचा न्यायालयाने पिसीआर दिला आहे.
तालुक्यातील कंकरवाडी येथिल आरोपी लक्ष्मण विश्वनाथ जाधव हा वैवाहीक इसमावर ता.9 एप्रिल ला अप.क्रमांक 295/ 2025 कलम 137(2)बिएन.एस.मधील गुन्हा दाखल झाला होता. पिडीताच्या जबाबा वरून कलम 64 (1) 64 (2) एफ.आय.एम.65 (1) -69 – 87 बिएन.व कलम 4 – 6 पोक्सो कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.परंतु सदर आरोपीने पिडीत मुलीला फरार करून आपला मोबाईल बंद केल्याने पोलीसांच्या तपासाला यश मिळत नव्हते.
उपविभागीय अधिकारी नवनदिप आग्रवाल यांच्यासह ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पिएस.आय.अशोक गिते,पो.काॅ.रामेश्वर काळे सायबर सेलचे इंगळे व बोरकर यांच्या मदतीने आरोपी लक्ष्मण जाधव याचा पुणे जिल्ह्यातील एका गावा मधुन मोठ्या शिताफीने माग लावत ताब्यात घेत पिडीत मुलगी तीच्या वडीलांच्या ताब्यात दिली. (Minor Girl Kidnapping) आरोपी लक्ष्मण जाधव वैवाहीक आसुन त्याला दोन आपत्य आहेत. त्याची पत्नी मागील दोन वर्षांपासुन माहेरी राहात आसल्याची माहीती आहे. आरोपी लक्ष्मण जाधव याने आपल्याच नातेवाईकाच्या मुलीस फुस लावुन पळवुन नेले होते. आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल केले आसुन, दोन दिवसाचा पि.सी.आर.घेतला आहे.