आ. संजय गायकवाड यांच्या प्रयत्नातून रस्ते विकासासाठी पुन्हा 86 कोटी मंजूर
बुलढाणा (MLA Sanjay Gaikwad) : बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील (Buldhana Assembly Constituency) बुलढाणा व मोताळा या दोन तालुक्यातील रस्त्यांना आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्नामुळे जीवनदान मिळाले आहे. विविध गावांना जोडणारा रस्ता हा प्रति हायवे सारखा दर्जेदार होत आहे, आता पुन्हा त्याच पार्श्वभूमिवर बुलडाणा शहरतील विविध परिसरातील दर्जेदार रस्त्यासाठी आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी तब्बल 86 कोटी रुपयाचा निधी खेचुन आणला आहे.
रस्ता हा विकासाच्या कणा समजला जातो. ज्या परिसरातील रस्ता हा वाहतुकीसाठी चांगला असतो त्या परिसराचा विकास झपाट्याने होतो. या तत्त्वावर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील रस्ते दर्जेदार व्हावे यासाठी शासन दरबारी प्रयत्नशील आहेत. बुलढाण्यातील अनेक नगरात सीमेंटचे रस्ते बनिवण्यात आले आहे. आता उर्वरित परिसरातील कामाकडे आ संजय गायकवाड यांनी लक्ष्य केले आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या वतीने नगरोत्थान महाअभियान योजने अंतर्गत बुलढाणा विधानसभा मतदारसंघाला रस्त्याची दर्जेन्नती करण्यासाठी तब्बल 86 कोटी रुपयास मान्यता देण्यात आली.
या निधीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 8 एक्सार्टिका आपारमेंट पासून ते मुठे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण त्यासह दोन्ही बाजूने नाली व पेवर ब्लॉक बसवण्याकरिता सुमारे साडेअकरा कोटी, प्रभाग क्रमांक 8 येथील ओयासिस अपार्टमेंट पासून ते नगरपरिषद हद्द पर्यंत सिमेंट काँक्रीकरण रस्त्यासह (Buldhana Road) दोन्ही बाजूने नाली व पेवर ब्लॉक बसवण्यासाठी 6 कोटी 11 लाख रुपये, प्रभाग क्रमांक 1 येथील डॉल्फिन स्विमिंग पूल पासून ते नगर परिषद हद्दीपर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण सह दोन्ही बाजूने नाली व पेव्हर ब्लॉक साठी 9 कोटी 76 लाख, प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्वे क्रमांक 49 पासून ते नगरपरिषद हद पर्यंत विकास योजना रस्ते साठी सिमेंट काँक्रिटीकरण तसेच दोन्ही बाजूने नाली व पेव्हर ब्लॉक करिता 4 कोटी 99 लाख रुपये, प्रभाग क्रमांक 14 येथील कषी उत्पन्न बाजार समिती पासून ते धाड रोड जोडणाऱ्या रस्त्यापर्यंतच्या डांबरीकरण सह दोन्ही बाजूने नाली व फेवर ब्लॉकसाठी 6 कोटी 36 लाख रुपये, प्रभाग क्रमांक 14 येथील हरिओम आईस्क्रीम शॉप ते सर्कुलर रोड कडे जाणाऱ्या सिमेंट काँक्रीट करण्यासाठी ब्लॉक करिता 2 कोटी 48 लाख रुपये, प्रभाग क्रमांक 14 मधील चिंचोले चौकापासून ते पंदाडे किराणा शॉप पर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण व दोन्ही बाजूने नाले व फेवर ब्लॉक करिता 2 कोटी 92 लाख, प्रभाग क्रमांक 8 मधील राजमाता चौकापासून ते प्रभाग क्रमांक एक आयटीआय कॉलेजपर्यंत दोन्ही बाजूने नाली व पेवर ब्लॉक करीता 9 कोटी 52 लाख रुपये, प्रभाग क्रमांक 11 तहसील चौकापासून सर्कुलर रोड पर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण तसेच दोन्ही बाजूने नाली व पेवर ब्लॉक करिता 7 कोटी 97 लाख रुपये, प्रभाग क्रमांक 11 येथील सर्किट हाऊस पासून ते तहसील चौक पर्यंत रस्त्याच्या सीमेंट काँक्रिटीकरण सह दोन्ही बाजूने नाली व पेवर ब्लॉक करिता 4 कोटी 95 लाख, प्रभाग क्रमांक 13 अष्टविनायक नगर नाम फालक पासून ते नगर परिषद हद्दीपर्यंत सिमेंट रस्त्याचे काँक्रिटीकरण सह दोन्ही बाजूने नाली व पेव्हर ब्लॉक करिता 4 कोटी 44 लाख, भू सिंचन कार्यालयापासून ते गायकवाड हॉस्पिटल व पुढे राजमाता चौकापर्यंत रस्त्याचे सिमेंट सह नाली बांधकामा करण्यासाठी 7 कोटी 96 लाख रुपये, प्रभाग क्रमांक 11 तहसील ऑफिस पासून ते एसबीआय इन टच बँकेपर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्यासाठी बांधकाम करिता 3 कोटी 38 लाख रुपये असे एकूण 86 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.
या निधीच्या माध्यमातून मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्ते हे प्रथमच (Buldhana Road) सिमेंट काँक्रिटीकरण होऊन प्रति हायवे सारखे रस्ते उपलब्ध होणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकात उत्साहाचे वातावरण आहे.