औंढा नागनाथ (MLA Santosh Bangar) : शहरात घरोघरी ज्येष्ठा गौरीची स्थापना करण्यात आली ज्यामध्ये औंढा नागनाथ येथील सचिन राठोड (Sachin Rathore )यांच्या निवासस्थानी आमदार संतोष बांगर ()MLA Santosh Bangar यांनी अतिवृष्टी तसेच कोरोना काळात केलेल्या नागरिकांना केलेल्या मदतीचा देखावा सादर करण्यात आला होता
औंढा नागनाथ शहरात ज्येष्ठा गौरीच्या सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला असून या निमित्त औंढा नागनाथ येथील बंजारा कॉलनी भागात असलेल्या सचिन राठोड (Sachin Rathore) यांच्या निवासस्थानी आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी अतिवृष्टीत अनेक नागरिकांना व चार दिवसाच्या बाळाला पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचा तसेच लाडली बहीण व कोरोना काळातही आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या कामाचा उपयोग देखावा सादर करण्यात आला होता.
त्यादरम्यान हा देखावा पाहण्यासाठी बंजारा कॉलनीसह औंढा नागनाथ शहरातील महिला भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. दरम्यान या आगळ्यावेगळ्या देखाव्याची सर्वत्र चर्चा होत होती तर आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी केलेल्या कार्याला अनेकांनी सलाम केला आहे. यावेळी नगराध्यक्षा सपना ताई कनकुटे, प्रियंका चव्हाण, सचिन राठोड, प्रदीप कनकुटे सखाराम राठोड आदी उपस्थित होते.