ब्रम्हपुरी (Bramhapuri police) : येथील समता कॉलनीत असलेले मोबाईलच्या दुकानात चोरी केलेल्या चोरट्यांना ब्रम्हपुरी पोलिसांनी अटक करून त्यांचेकडून वेगवेगळ्या कंपनीचे ११ मोबाईल संच जप्त करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, २९ मे रोजी मोबईलचे दुकानमालक सतीश लालदास गजभिये यांनी मोबाईल दुकानात चोरी झाल्याची तक्रार (Bramhapuri police) ब्रम्हुपरी पोलिस ठाण्यात केली. चोरट्यांनी दुकानात विक्रीसाठी ठेवलेले वेगवेगळ्या कंपनीचे ११ अँड्रॉइड मोबाईल संच चोरून नेले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सिसिटीव्ही कॅमेरे तपासून शोध घेत असताना दोन मोटर सायकल वर एकूण ७ इसम हे रात्र दरम्यान फिरत असताना दिसून आल्याने त्यांचे सीसीटीव्ही फुटेज प्रसारित करून शोध घेतला असता आरोपी रंजीत खुशाल मेंढे वय १९ वर्ष राहणार उदापूर , सौरभ शिवलाल उत्तरमारे वय २१ वर्षे, एकूण ०५ विधी संघर्ष बालक राहणार ब्रह्मपुरी यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे ताब्यात घेण्यात आलेले आहे.
आरोपी व विधी संघर्ष बालक यांच्याकडून चोरी (Bramhapuri police) गेलेले एकूण ११ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल किंमत १४, ३०० रुपये चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनात सहा. पो नि मनोज खडसे, पोहवा योगेश शिवणकर, पो हवा अजय कटाईत ,नापोअ मुकेश गजबे, पोशी स्वप्निल पळसपगार यांनी पार पाडली.




