युवक गंभीर जखमी, रोहना फाटा नजीकची घटना!
मानोरा (Motorcycle Accident) : तालुक्यातील कारखेडा येथील उमेश रमेश ढोके ( वय ५० वर्ष ) हा इसम आपली नवीन मोटर सायकल शोरूम मधून घरी घेऊन येत असताना रोहना फाट्याजवळ अचानक वन्यप्राणी (Wild Animals) रोडवर आडवा आल्याने अपघाताची घटना घडली. दुचाकी वरून पडल्याने तोंडाला मार लागून जबर जखमी झाल्याने उपचारासाठी जखमीला युवकाला (Youth) नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Government Medical College) हलविण्यात आले आहे. उमेश ढोके हे बार्शीटाकळी या गावातील एका शोरूम मधून नवीन दुचाकी खरेदी करून कारखेडा या आपल्या गावी येत होते. दोन दिवसांपूर्वी दि. २६ ऑगस्ट रोजी रोहना फाट्याजवळ अचानक वन्यप्राणी दुचाकी समोर आल्याने दुचाकीवरून पडून उमेश ढोके यांच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे उपचार सुरू!
अपघातग्रस्त गंभीर जखमी धोके यांना उपचारासाठी वाशिमला रुग्णालयाने दाखल न केल्यामुळे त्याला अकोला येथे हलविण्यात आल्याची माहिती त्याच्या भावाने दिली. अपघातग्रस्ताची गंभीर स्थिती लक्षात घेऊन अकोला येथे सुद्धा सरकारी रुग्णालयात उपचारानंतर, जखमी ढोके यांना नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी (Treatment) त्यांचे भाऊ गजानन रमेश ढोके यांना नेऊन दाखल करावे लागले.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी अमोल पाटणकर यांनी जखमींच्या कुटुंबाला सहकार्य केले!
गणेश जयंतीच्या सलग सुट्ट्या असल्याने जखमी ढोके यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमीला पुढे शासकीय महाविद्यालयात ठेवण्यास अडचणी येत असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी अमोल पाटणकर यांनी जखमींच्या कुटुंबाला सहकार्य केले. आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या पार्वतीबाई राठोड यांनी सुद्धा जखमी साठी धावपळ केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.