हिंगोली / औंढा नागनाथ (Ubatha Andolan) : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार, शेतकरी सन्मान योजनेतुन १५ हजार रुपये देणार या खोटारड्या सरकारने केवळ गाजावाजा करून दिलेले आश्वासन केवळ कागदावरच राहिल्याने त्यांची आठवण करून देण्यासाठी शिवसेना उबाठा तर्फे आंदोलन करण्यात आले. ५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात माजी आ. डॉ. संतोष टारफे, जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपु पाटील, संदेश देशमुख, विठ्ठल चौतमल, गणेश शिंदे, परमेश्वर मांडगे, भानुदास जाधव, सखाराम उबाळे, वसीम देशमुख, रेणुका पतंगे, संतोष देवकर, शंकर घुगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
औंढ्यातही निवेदन
सरकारने मोठ्या गाजावाजाने जाहीर केलेल्या अनेक योजना आणि दिलेली आश्वासने आज केवळ आणि केवळ कागदावरच राहिली आहे त्यामुळे शेतकरी प्रचंड निराशेच्या गर्दीत ढकलला गेला असून अनेक मूलभूत समस्यांनी डोके वर काढले आहे. (Ubatha Andolan) सत्ताधारी पक्षांनी शेतकऱ्यांना लगोलग कर्जमाफी देण्याचा गाजावाजा केला तसेच वेळेत कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन पोर पोर जास्त कर्ज देण्याची घोषणा केली होती मात्र इथे अनुदानाचाच पत्ता नाही याबद्दल तीव्र संताप व्यक्त करत खालील प्रमुख मुद्यावर लक्ष देऊन कार्यवाही तात्काळ लक्ष करण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट औंढा नागनाथ यांच्याकडून करण्यात आली आहे.
निवेदनावर माऊली उर्फ ज्ञानेश्वर झट्टे शिवसेना तालुकाप्रमुख औंढा नागनाथ, गणेशराव देशमुख शिवसेना तालुकाप्रमुख औंढा नागनाथ बबनराव ईघारे सुनील खंडागळे मधुकर गोरे भगवानराव कदम गजानन नागरे मल्हार अनिलराव शिंदे, बाळू पाटील कुरे संतोष रेणके आकाश सुतारे तुकाराम गायकवाड लक्ष्मण भूमीत राम देशमुख रवी डोंगरदिवे संतोष गारकर एनडी नागरे ज्ञानदेव गायकवाड विष्णू नांदे शंकरराव आत्मा प्रेम स्वामी शिवाजी ढोबळे नवनाथ पाटील निवेदनावर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत तर सदर निवेदन औंढा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदन पाठवण्यात आले.