फवारणीच्या मागणीकडे मनपा प्रशासनाने केले दुर्लक्ष!
परभणी (Municipality Administration) : शहरातील प्रभाग 4 मधील काही नगरात डासांमुळे (Mosquitoes) त्रास होत असल्याने धूर फवारणी (Smoke Spray) करण्याची मागणी उपशहर प्रमुख वामन मोरे यांनी केली. याकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने मोरे व त्यांचा मित्र कांबळे या दोघांनी स्वतः नागरिकांच्या हितासाठी फवारणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
कचरा व नाल्या साफसफाई व्यवस्थित न झाल्यामुळे नागरिकांना डासांचा त्रास!
पावसाळा सुरू झाल्यामुळे मच्छरांचे प्रमाण वाढत आहे. परभणी शहरातील अनेक भागात कचरा व नाल्या साफसफाई (Cleaning) व्यवस्थित न झाल्यामुळे नागरिकांना डासांचा त्रास व दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे . प्रभाग 4 मध्ये धुर फवारणी करण्याची मागणी शिवसेना उपशहर प्रमुख वामन मोरे यांनी महापालिकेचे आयुक्त (Municipal Commissioner) यांच्याकडे केली. मागणी केल्यानंतरही महानगरपालिकेने (Municipal Corporation) धुर फवारणी प्रभाग 4 मध्ये केलीच नाही. मनपाच्या ढिसाळ कार्यपद्धतीच्या विरोधात वामन मोरे व पंडित कांबळे या दोघांनी दत्तनगर, विकास नगर, समाधान नगर, मंगलमूर्ती नगर, आनंद नगर या भागात 17 जून रोजी स्वतः पाठीवर फवारा घेऊन फवारणी केली. हा प्रकार नागरिकांनी (Citizens) पाहिल्यानंतर, दोघांचे कौतुक केले. दुसरीकडे मनपा प्रशासनाने (Municipality Administration) मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.