कावड महोत्सव मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य!
बार्शी टाकळी (Nagar Panchayat) : सोमवार दिनांक 28 जुलैला श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार असल्याने बार्शीटाकळी येथील खोलेश्वर शिवालयातील पिंडीवर जलाभिषेक करण्यासाठी 20 ते 25 कावड धारी मंडळाकडून शेकडो शिवभक्त जलाभिषेक करणार आहेत. सदर मार्ग हा बार्शीटाकळी येथील बायपास चौक पोलीस स्टेशन तथा आठवडी बाजार परिसरातून नगरपंचायत व बाजार लाईन मधील रस्त्यावर अनेक ठिकाणी लहान मोठ्या खड्ड्याचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे कावड महोत्सवातील भक्तांना यांचा कमालीचा त्रास होणार आहे. या रस्त्यावरून कावड महोत्सव (Kavad Festival) होत आहे. याची जाणीव बार्शीटाकळी नगरपंचायतचे मुख्याधिकारी राहुल कंकाळ व बांधकाम शाखा अभियंता (Construction Branch Engineer) संकेत दोनच तुनकोपलकलवार यांना असल्यावरही त्यांनी 27 जुलै ला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सदर रस्त्यावरील लहान मोठ्या खड्ड्यात मुरूम तथा डस्ट अर्थातचुरी टाकलेली नसल्याने कावड मंडळातील भक्तांना यांचा कमालीचा त्रास होणार आहे.
मुख्याधिकारी म्हणतात मी वर्क ऑर्डर करून आदेश दिलेत!
या संदर्भात बार्शीटाकळी नगरपंचायतचे (Barshitakali Nagar Panchayat) मुख्याधिकारी राहुल कंकाळ यांनी संबंधिताला कामाचे वर्क आदेश दिलेले बाहेर असे सांगितले. मुख्याधिकाऱ्यांनी आदेश दिलावरही अद्याप पर्यंत, सध्या रस्त्यावर असलेले खड्डे बुरलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे नगरपंचायत आता खालील अधिकारी मनावर घेत नाहीत. अशा प्रकारच्या उलट सुलट खमंग चर्चा बार्शीटाकळी शहरात होत आहे.