Chandrapur :- नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत कान्पा परीसरातील जंगलात अवैध मोहा हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाई केली. आरोपी राहुल तिमाजी मोहनकर (२७) रा. कान्पा हा जंगलात हातभट्टी लावुन मोहा दारू गाळीत असताना त्याचे कडे मोहादारू ४० लिटर व मोहा फुल सडवा ३५० किलो व साहीत्य असे एकूण २२, ७०० रूपये चा मुद्देमाल मिळून आला. आरोपी विलास सुर्यभान खोब्रागडे (३८ ) रा. कान्पा हा जंगलात हातभट्टी लावून मोहा दारू (alcohol) गाळीत असताना त्याचे कडे मोहादारू ३० लिटर व मोहाफुल सडवा १०५० किलो व साहित्य असे एकूण ५३,७०० रूपयांचा मुद्देमाल मिळून आला.
साहित्य असे एकूण ५३,७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त
आरोपी महेंद्र तिमाजी मोहनकर (३४ ) रा. कान्पा हा जंगलात हातभट्टी लावून मोहा दारू गाळीत असताना त्याचे कडे मोहा फुल सडवा ९५० किलो व साहित्य असे एकूण ४५,२०० रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. आरोपी रविंद्र धनराज अलोने (३५) रा. कान्पा हा जंगलात हातभट्टी लावून मोहा दारू गाळीत असताना त्याचेकडे मोहा फुल सडवा ९०० किलो व साहीत्य असे एकूण ४२,९५० रूपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने नमुद ४ आरोपी विरूध्द दारूबंदी अधिनियमान्वये कार्यवाही (Proceedings) करून त्यांचेकडून एकूण १,६१,५५० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधिकक्षक सुदर्शन मुम्मका , अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ‘ोसरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांचे नेतृत्वात सुरसेन बिके, किशोर देशमुख, ज्ञानेश्वर गिरडकर, दिलीप चौधरी, भरत घोळवे, महानंदा आंधळे, अरूणा धुर्वे यांनी केली