नागपूरच्या तरुणांनी राज्य सरकार व शिक्षणमंत्र्यांना लाखो पोस्टकार्ड पाठवून निषेध नोंदविला
नागपुर (Nagpur) : ‘राज्य शैक्षणिक व शालेय शिक्षण आराखडा २०२४’ हा आराखडा राज्य सरकारविरोधात असंतोषाचे कारण ठरला आहे. विशेषतः शिक्षण विभागाद्वारे नवीन शैक्षणिक सत्रात मनुस्मृतीचे (manusmriti) श्लोक वर्ग ३ ते १२ वी पर्यंत अनिवार्य केल्या गेले आहे, हे पूर्णतः संविधान विरोधी असल्याचा व संविधानात नमूद ‘धर्मनिरपेक्ष’ (secular) शब्दावर घावा घालणारे असल्याचा आरोप करीत नागपूरच्या तरुणांनी राज्य सरकार व शिक्षणमंत्र्यांना लाखो पोस्टकार्ड पाठवून निषेध नोंदविला आहे.
मनुस्मृतीचे वादग्रस्त श्लोक हटविण्यात यावेत
येत्या शैक्षणिक स्तरापासून अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक लागू केल्या जाणार आहे. त्यावर राज्यातून सूचना व आक्षेप मागविण्यात आले होते. त्याविरोधात साहित्य क्षेत्रापासून सामाजिक स्तरावर विरोध होत आहे. मनुस्मृतीचे (manusmriti) वादग्रस्त श्लोक हटविण्यात यावेत; तसेच धर्मनिरपेक्ष, सर्वसमावेशक, बहुसांस्कृतिक भारतीयतेचा आणि राज्यघटनेतील (constitution) तत्वांचा संस्कार शैक्षणिक आराखड्यातून करावा, अशी मागणी केली आहे. शिक्षणमंत्र्यांच्या नावे पोस्टकार्ड (postcard) पाठवून निषेध करण्यात येत आहे. नागपुरातून अनिकेत कुत्तरमारे, आशिष फुलझेले, अक्षय खोब्रागडे व जय भीम मित्र मंडळातर्फे हे आंदोलन केले आहे.




 
			 
		

