नांदेड (Nanded):- दांगट समितीच्या अहवालातील कर्मचाऱ्यांची कोणतीही कपात न करता महसूल विभागाचा (Department of Revenue) सुधारित आकृतीबंद लागू करावा. यासह इतर विविधमागण्यांसाठी १० जुलै पासून नांदेड जिल्हा महसुल कर्मचारी संघटनेचे आंदोलन सुरू आहे.
पदावर तात्काळ पदोन्नती देण्यात यावी, महसूल विभागाचा आकृतीबंध लागू करावा
महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गिरीष येवते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आजपासून लेखणीबंद आंदोलन सुरू आहे. यामुळे नागरिकांची कामे देखील खोळबंली आहेत. मराठवाडा (Marathwada) विभागातील अव्वल कारकून, मंडळाधिकारी, संवर्गातून नायब तहसीलदार पदावर तात्काळ पदोन्नती देण्यात यावी, महसूल विभागाचा आकृतीबंध लागू करावा, नायब तहसिलदार संवर्ग हा राजपत्रित संवर्ग असून सुध्दा त्यांची वेतनश्रेणी वर्ग ३ संवर्गाची देण्यात आली आहे. त्यात बदल करावा, कर्मचाऱ्यांचे वेतन नियमितपणे प्राधिकार पत्रावर काढण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा, महसूल सहायक व तलाठी ही पदे जिल्हास्तरीय व समकक्ष अर्हतावारी असूनही महसूल सहायकांचे ग्रेड पे व तलाठी यांचे ग्रेड पे यामध्ये असलेली तफावत दूर करण्यात यावी,यासह अनेक मागण्यासाठी नांदेडमध्ये हे आंदोलन सुरू आहे.




