अकोला बाजार (Daughter Rape Case) : तालुक्यातील वडगाव जंगल पोलिस स्टेशन अंतर्गत एका गावात नराधाम बापाने आपल्या स्वतःच्या चौदा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची किळसवाणी, धक्कादायक घटना उघडकीस आली.
लैंगिक अत्याचार व बलात्काराची बाब (Daughter Rape Case) पीडित मुलीने आईला शेतातून परत आल्यावर सांगितला. आईच्या लक्षात येताच पीडित मुलीच्या आईने तिच्या माहेरी फोन लाऊन नातेवाईकांना बोलावून घेतले आणि झालेला प्रकार सांगून तडकाफडकी वडगाव जंगल ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल केली केली. यावरून वडगाव जंगल पोलीस ठाण्याचे ठाणेदार विकास दांडे यांनी बाल लैंगिक अत्याचार व बलात्कार अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास वडगाव (जं) पोलिस करीत आहे.