विसर्जन तळ्यांवर मोठ्या संख्येने भाविक उपस्थित!
पातूर (Navratri Festival) : लोकमान्य टिळक गणेश उत्सव मंडळ पातूर तर्फे देवी विसर्जन सोहळा पार पडला. विसर्जनासाठी आलेल्या भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंडळातील कार्यकर्त्यांनी जलतरण सहाय्यकाचे काम करून महत्वाची जबाबदारी पार पाडली. विसर्जन तळ्यांवर मोठ्या संख्येने भाविक (Devotee) उपस्थित होते. गर्दीमध्ये कुठलाही अपघात होऊ नये तसेच सुरक्षितरीत्या विसर्जन पार पडावे, यासाठी जलतरण सहाय्यकांनी विशेष दक्षता घेतली. त्यांच्या सतर्कतेमुळे विसर्जनाची प्रक्रिया सुरळीत पार पडली.
लोकमान्य टिळक गणेश उत्सव मंडळाने राबविलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक!
सामाजिक कार्यकर्ते विशाल राखोंडे, धारकरी विजय राऊत, डॉ.शिवकुमारसिंह बायस यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य टिळक गणेश उत्सव मंडळाने (Lokmanya Tilak Ganesh Festival Mandal) राबविलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चुनडे, गणेश सावकार,श्रीकृष्ण कांबळे, विशाल सौंदळे,अनुज गिरे,ओम ढोणे,साहिल मेसरे,आर्यन सिताबराव अण्णा ढोणे,पवन वाघमारे यांच्या सह नगरपरिषद पातूरचे कर्तव्यदक्ष अग्निशमन कर्मचारी सैय्यद अश्फाक यांनी यामध्ये विशेष परिश्रम घेतले.