संस्थानच्या वतीने मंदिर परीसराचे शुभोगीकरण!
रिसोड (Navratri Festival) : तालुक्यातील रिसोड ते लोणार राज्यमार्गावरून मोरगव्हाण फाट्या वरून दक्षिणेस उंच माळावर लोढाई माता देवीचे स्थान आहे. या ठिकाणी नवरात्र उत्सवाला ता.22 सप्टेंबर पासुन प्रारंभ झाला आहे. या दरम्यान येथिल लोढाई माता संस्थानवर हजारो भाविक भक्तांची मांदायाळीला मागील आठ दिवसांपासून प्रारंभ झाला आहे. यावेळी घटस्थापना माजी सभापती गजानन पाचरणे,संस्थानचे अध्यक्ष भानुदास पाचरणे,गोरख पाचरणे,विलास काकडे,प्रदिप पाचरढे,नारायण पाचरणे,महादेव देशमुख, मारोतराव कोकाटे दत्तराव कोकाटे ,उद्धवराव मुटकुळे, गजानन गरकळ, जगण गरकळ,पुरुषोत्तम गरकळ ,शिवाजी पाचरने भर जहागीर,आसोला येथिल पुजा-यांच्या उपस्थित मोरगव्हाण वाडी,आसोला येथिल भक्तगणाच्या (Devotees) माध्यमातून घटस्थापना करण्यात आली आहे.
यात्रेला मोठ्या प्रमाणात भक्तगणांचा प्रतिसाद!
तालुक्यातील आसोला शेतशिवारातील लोढाई माता संस्थानच्या सर्वांगीण विकासाठी लाखो रूपयांचा निधी शासणाच्या विविध फंडातुन खर्च करीत मंदिर परीसराच्या सौंदर्यात भर पाडण्याचे काम करण्यात आलेले आहे. आसोला शेतशिवारातील लोढाई माता संस्थानचे मंदिर हे शेकडो फुट उंचीवर आहे.या मंदिरामध्ये भक्तगणांना सुखरून दर्शनासाठी जाता यावे यासाठी संस्थानच्या माध्यमातून खासदार, आमदार,जिल्हा परीषद,विविध फंडातील निधीमधुन विकास कामे करण्यात आलेली आहे.या मंदिर (Temple) परीसरामध्ये विजयादशमी च्या एक दिवस आधी मोठी यात्रा भरते या यात्रेतील हजारो भक्तांसाठी यात्रा परीसराचे सपाटीकरण,पिण्याचे पाणी,पथदिवे,महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.येथिल एक दिवशीय यात्रेला मोठ्या प्रमाणात भक्तगणांचा प्रतिसाद लाभतो हे विशेष.